Kalyan Saam
मुंबई/पुणे

Kalyan Crime: केळीच्या बंडलवरून वाद; तरूणाकडून भरदिवसा कुटुंबावर कैचीनं वार; मार्केटमध्ये राडा

Kalyans APMC Market Sees Scissor Attack: २० वर्षीय चिराग सोनी या तरुणाने पती, पत्नी आणि त्यांच्या मुलावर कैचीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात चमनलाल कार यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

Bhagyashree Kamble

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. २० वर्षीय तरूणाने पती, पत्नी आणि त्यांच्या मुलावर कैचीने सपासप वार केले आहे. या हल्ल्यात पतीचा जागीच मृत्यू झाला असून, मुलगा गंभीर जखमी झाला आहे, तर पत्नीला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेनंतर बाजारपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी आरोपीला अटक केली आहे.

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चिराग सोनी या २० वर्षीय आरोपीने किरकोळ वादातून एका कुटुंबावर कैचीने हल्ला केला. या कैची हल्ल्यात चमनलाल कार यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचा मुलगा कार्तिक आणि मृत व्यक्तीची पत्नी सध्या कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

चमनलाल कारला आणि चिराग सोनी दोघेही एपीएमसी मार्केटमध्ये शेजारी शेजारी केळीची पाने विकण्याचा व्यवसाय करत होते. आज सकाळी विक्रीसाठी आणलेली केळीच्या पानांची बंडल अदलाबदल झाल्याने दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेला. या वादातून चिरागने अचानक चमनलाल कारला आणि त्यांच्या कुटुंबावर कैचीने हल्ला केला.

हल्ला केल्यानंतर या परिसरात एकच खळबळ उडाली. बाजारपेठ पोलीस तातडीने एपीएमसी मार्केट परिसरात दाखल झाले. त्यांनी हल्ला झालेल्या कुटुंबाला रूग्णालयात नेले. तसेच आरोपीला अटक केली. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT