Kalyan Viral Video News Saam TV
मुंबई/पुणे

Viral Video : मुलं खेळत असतानाच किल्ल्यात शिरला कोब्रा; घटनेचा Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का

हा कोब्रा नाग इंडियन कोब्रा जातीचा असून साडे तीन फुट असल्याची माहिती सर्पमित्र हितेशने दिली आहे.

प्रदीप भणगे

कल्याण : सध्या दिवाळीची (Diwali) धामधुम जोरात सुरु आहे. दिवाळी म्हटलं की जसे फटाके फराळ आपल्या डोळ्यासमोर येतो, तसंच दिवाळीतील एक अविभाज्य भाग म्हणजे चिमुरड्यांनी बनवलेले किल्ले.

महाराष्ट्रात तर प्रत्येक वाडी वस्तीवर किल्ले तयार केले जातात. या किल्यावरती प्रतिकात्मक सैन्य, मगर, सिंह, वाघ देखील ठेवले जातात. मात्र, किल्ल्यावरती खरा कोब्रा (Cobra) असल्याचं आपण बघितलं नसेल. पण सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये किल्ल्यावर कोब्रा नागाने कब्जा केल्याचं दिसतं आहे.

पाहा व्हिडीओ -

फणा काढून एक कोब्रा नाग किल्लयावर बसल्याची घटना कल्याण पश्चिम (Kalyan West) भागातील सापड गावात घडली आहे. सापड गावात मढवी कुटूंब राहतात. त्यांच्या कुटूंबातील ४ ते ५ मुलांनी मातीचा किल्ला घराच्या अंगणात उभारला आहे. या किल्ल्याच्या खालच्या बाजूला बिळासारख्या जागेत कोब्रा नाग शिरला होता. मात्र, तोपर्यत ही बच्चे कंपनी खेळण्यात गुंग होती.

काही वेळाने बच्चे कंपनी किल्लावर संध्याकाळची रोषणाई करण्यासाठी तयारी करत असतानाच, हा कोब्रा नाग अचानक किल्ल्यात दिसला. या कोब्रा नागाला पाहून मढवी कुटूंबाबतील बच्चे कंपनीने घाबरून धूम ठोकत, किल्ल्यात नाग असल्याची माहिती वडिलांनी दिली.

पाहा व्हिडीओ -

त्यानंतर त्याच्या वडिलांनी ही माहिती वडिलांनी सर्पमित्रांना दिल्यानंतर सर्पमित्र हितेश करंजळकर याने रेस्क्यू करत शिताफीने नागाला पकडून पिशवीत बंद केलं. हा कोब्रा नाग इंडियन कोब्रा जातीचा असून साडे तीन फुट असल्याची माहिती सर्पमित्र हितेशने दिली. या कोब्रा नागाला कल्याण वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने जंगलात सोडून जीवदान दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

Maharashtra News Live: पंढरपुरात चंद्रभागेला पूर; ७० कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना

Hingoli Accident: महामार्गावर भयंकर अपघात! खड्ड्यात कार आदळून उलटली, २ तरुणांचा जागीच मृत्यू

Jeera Water: दररोज सकाळी 30 दिवस जिऱ्याचं पाणी प्या; या 5 समस्यांपासून मिळेल आराम

SCROLL FOR NEXT