kalyan latest saam tv
मुंबई/पुणे

Kalyan News: मुस्लिमांना घर नाकारल्याचा आरोप; एमआयएम नेत्याची थेट पोलिसांत धाव, काय आहे संपूर्ण प्रकरण?

kalyan latest news : मुस्लिमांना घर नाकारल्याचा आरोप एमआयएम नेत्याने केला. त्यानंतर या नेत्याने पोलिसांत तक्रार दिली.

Vishal Gangurde

मुस्लिमांना घर मिळणार नसल्याचा आरोप

एमआयएम अध्यक्ष अशफाक शेख यांची थेट पोलिसांत तक्रार

टेलीकॉलरने फोन करत दिलगिरी व्यक्त केल्याचे सांगितले

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

Kalyan News : मुस्लिम लोकांना घर मिळणार नाही, असे एका टेलीकॉलरने सांगितल्याचा आरोप करत कल्याण शहर एमआयएम अध्यक्ष अशफाक शेख यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

अशफाक शेख यांना शुक्रवारी दुपारी एका टेलीकॉलरचा फोन आला होता. समोरच्या व्यक्तीने कोनगाव परिसरातील महामार्गालगत असलेल्या एका इमारतीतील फ्लॅट्सबाबत माहिती दिली. संबंधित इमारत स्वस्त दरात उपलब्ध असल्याचे सांगत त्याने घरांच्या किमती, सुविधा आणि इतर तपशीलांची माहिती दिली. यावेळी अशफाक शेख यांनी आपल्या आर्थिक क्षमतेबाबत माहिती दिल्यानंतर काही प्रश्न विचारले.

सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर त्यांनी शेवटी, या ठिकाणी मुस्लिम लोकांना घर मिळेल का? असा प्रश्न विचारला. त्यावर समोरच्या व्यक्तीने मुस्लिम लोकांना घर मिळणार नाही, असे स्पष्ट सांगितल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. हे उत्तर ऐकताच संतप्त झालेल्या अशफाक शेख यांनी, मुस्लिमांना घर मिळत नसेल तर तुम्ही मला फोन कसा केला? माझे नाव आणि नंबर तुमच्याकडे होते ना? असा सवाल संबंधित व्यक्तीला केला. त्यानंतर त्या व्यक्तीने दिलगिरी व्यक्त करत फोन कट केल्याचे सांगण्यात आले.

या घटनेनंतर अशफाक शेख यांनी तातडीने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. संबंधित फोन करणारी व्यक्ती कोण आहे, विकासक कंपनीचे नाव घेत होता, ती कंपनी कोणती आहे, तसेच संबंधित इमारत नेमकी कुठे आहे याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुस्लिम लोकांना घर मिळणार नाही, असे सांगणारे नेमके कोण आहेत? असा संतप्त सवालही अशफाक शेख यांनी उपस्थित केला आहे. आता या प्रकरणात पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

SCROLL FOR NEXT