रेल्वेमध्ये दरोडा टाकणाऱ्या 5 दरोडेखोरांना रेल्वे पोलिसांकडून अटक SaamTvNews
मुंबई/पुणे

रेल्वेमध्ये दरोडा टाकणाऱ्या 5 दरोडेखोरांना रेल्वे पोलिसांकडून अटक

तबरेज शेख, दानिश खान, अजय दबडे, निजान शेख अशी या आरोपींची नावे असून यात एका 14 वर्षीय अल्पवयीन आरोपीचा देखील समावेश आहे.

प्रदीप भणगे

कल्याण : वसई येथे राहणारी जया पिसे नावाची महिला प्रवासी तिच्या मुलीसोबत काकीनाडा भावनगर एक्सप्रेसमधून  प्रवास करीत होती. 27 जानेवारी रोजी सदर महिला सोलापूर येथून रेल्वेत बसल्यानंतर गाडी कर्जत स्थानकाजवळ आली असता बोगीत काही प्रवाशांनी चोर चोर असा आरडाओरडा सुरु केला. प्रवाशांचा आवाज ऐकून जया यांनी त्यांची बॅग आपल्या जवळ सुरक्षितपणे घेऊन बसल्या. याच दरम्यान चार ते पाच जण त्यांच्या जवळ आले. वस्तूने भरलेली बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. जयाने त्यांना प्रतिकार केला.

हे देखील पहा :

एकाने चाकूचा धाक दाखवीत तिच्याकडील बॅग हिसकावून घेतली. याच दरम्यान एक सतर्क नागरीकाने 100 नंबरवरुन पोलिसांना फोन केला. नियंत्रण कक्षातून कल्याण जीआरपी आणि आरपीएफला माहिती दिली गेली. या ट्रेनमध्ये कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ जवानाने त्वरीत या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना कल्याण जीआरपीच्या हवाली केले.  याबाबत कल्याण जीआरपीच्या महिला पोलिस निरिक्षक अर्चना दुसाणे यांनी सांगितले की हे पाचही आरोपी पुण्याच्या कोंढवा परिसरात राहणारे आहेत.

तबरेज शेख, दानिश खान, अजय दबडे, निजान शेख अशी या आरोपींची नावे असून यात एका 14 वर्षीय अल्पवयीन आरोपीचा देखील समावेश आहे. कल्याण रेल्वे कोर्टात या चार जणांना हजर केले असता चारही आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींनी अशा प्रकारचा गुन्हा यापूर्वी केला आहे का याचा तपास पोलिस करीत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पार्लरला जायची अजिबात गरज नाही! मऊ आणि मुलायम केसांसाठी घरीच करा 'दही हेअरस्पा'; पहिल्याच वॉशमध्ये दिसेल फरक!

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे

सर्वात मोठी बातमी! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचं मोठं विधान; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

सुटलेलं पोट झटक्यात जाईल आत! रात्री भात खाण्याऐवजी खा 'हा' 1 पदार्थ; वजन राहील नियंत्रणात

BJP Politics: भाजपला मोठा धक्का! युवा नेता थेट दुसरा पक्ष काढणार; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT