Kalyan News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News: 'आदिवासींच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर..' श्रमजिवी संघटनेनं मुख्यमंत्र्यांना दिला गंभीर इशारा

Shramjivi Sanghatana News: 'आदिवासींच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, तर..' श्रमजिवी संघटनेनं मुख्यमंत्र्यांना दिला गंभीर इशारा

Satish Kengar

>> अभिजित देशमुख

Shramjivi Sanghatana Protest News:

कल्याण तालुक्यातील आदिवासींनी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वात कल्याण तहसील कार्यालयावर माेर्चा काढला. मुख्यमंत्री ठाणे जिल्ह्यातील आहे. तरीही जिल्ह्यातील आदिवासी समाज मूलभूत सोयी सुविधांपासून वंचीत आहे, श्रमजिवी संघटनेनं म्हटलं आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्या पर्यंत आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसणार असा इशारा श्रमजिवी संघटनेचे प्रदेश सचिव बाळाराम भोईर यांनी मोर्चा दरम्यान दिला आहे.

कल्याण तालुक्यात अनेक आदिवासी पाडे आहेत. ज्या ठिकाणी आदिवासी समाज मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे. आदिवासी बांधवांच्या मागणीसाठी आज आदिवासी समाज बांधवांनी श्रमजिवी संघटनेच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर घोषणाबाजी करीत या मोर्चाची काढला. (Latest Marathi News)

कल्याण तहसील कार्यालयात मोर्चेकऱ्यानी ठिय्या मांडला. समाजाला काय त्रास सहन करावा लागतो याची व्यथा तहसीलदारांसमाेर मांडली. श्रमजीवी संघटनेचे बाळाराम भोईर यांनी या आदिवासी बांधवांच्या मागण्यांचे मुख्यमंत्र्यांनाही पत्र देणार आहोत.

किती वाड्यांना रस्ते नाहीत. पिण्याचे पाणी नाही. किती लोकांना आधार कार्ड नाही. घरकुले नाहीत. याची गावाच्या नावासह यादी देणार. अधिकाऱ्यांनी या मागण्या पूर्ण केल्या नाही तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयात मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसल्याशिवाय श्रमजीवी संघटना राहणार नाही, असा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM थलपती विजय यांच्यानंतर आणखी एक अभिनेता येणार राजकारणात; चर्चांना उधाण

Makeup Tips: इंडियन स्किन टोननुसार मेकअप कसा निवडावा? फाउंडेशनपासून ब्लशपर्यंत जाणून घ्या ७ सोप्या टिप्स

ताप किती अंश धोकादायक आहे? या किरकोळ समस्या हलक्यात घेऊ नका

Maharashtra News Live Update: मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथे बर्निंग डंपरचा थरार

समृद्धी महामार्गावर १२ दिवस वाहतूक ब्लॉक; प्रवास करण्याआधी वेळापत्रक पाहा

SCROLL FOR NEXT