Kalyan Fire  Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Fire News: कल्याणमध्ये उंच इमारतीला भीषण आग, 14व्या मजल्यावरील फ्लॅट आगीच्या भक्ष्यस्थानी

या आगीत एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजीत देशमुख

कल्याण : कल्याण पश्चिममधील आधारवाडी येथील रौनक सिटी कॉम्प्लेक्समधील एका इमारतीतील फ्लॅटला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या १४ व्या मजल्यावरील फ्लॅटला ही आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

आग कशामुळे लागली याबाबत कोणतंही कारण अद्याप समोर आलेलं नाही. या आगीत एक महिला जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या महितीनुसार, इमारतीच्या या फ्लॅटमध्ये एक ६२ वर्षीय महिला स्वयंपाक बनवत होता. मात्र अचानक तिच्या कपड्याने पेट घेतला. आरडा ओरड झाल्याने आजूबाजूच्या रहिवाशांनी धाव घेत आग विझवत महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.

मात्र आग पूर्णपणे विझली नव्हती. त्यामुळे बंद दरवाजादाड आगीने पुन्हा रौद्र रूप धारण केले.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण अग्निशमन जवानांना यश आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haunted Island: जगातील सर्वात भयानक झपाटलेले बेट, आवाज, आत्म्यांचा त्रास! वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Viral Video : मुलीला शाळेत सोडताना अचानक आला पाऊस, चिमुकली भिजू नये यासाठी आईनं जे केलं ते पाहून कराल कौतुक; पाहा VIDEO

Mahakumbh Monalisa: करोडोंचे हिरे, आलिशान गाडी, महागडे कपडे महाकुंभाच्या मोनालिसाचा स्टेटस बघून व्हाल थक्क

Marathi Serial: अभिनेत्री समृद्धी केळकर दिसणार या मराठी मालिकेत

SCROLL FOR NEXT