13 years old minor girl killed in kalyan Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime: दुकानावर गेली पण परत आलीच नाही, १३ वर्षांच्या मुलीची लैंगिक अत्याचार करून हत्या; कल्याण हादरले

13 years old minor girl killed in kalyan: कल्याणमध्ये दुकानामध्ये खाऊ आणण्यासाठी मुलगी गेली होती. तिचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती.

Priya More

कल्याणनजीकच्या बापगाव परिसरामध्ये १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता. या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दुकानामध्ये खाऊ आणण्यासाठी ही मुलगी गेली होती. तिचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेला असलेल्या चक्की नाका परिसरामध्ये राहणारी १३ वर्षांची मुलगी खाऊ आणण्यासाठी दुकानामध्ये गेली होती. बराचवेळ ती घरी न आल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला. ९ तासांपासून मुलगी घरी न आल्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी शेवटी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. तर ही मुलगी दुसऱ्या दिवशी बापगाव परिसरामध्ये मृतावस्थेत आढळून आली.

या मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. तिच्यासोबत लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालातून मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केली असल्याचे उघड झाले आहे. या हत्येप्रकरणी दोन आरोपींची नावं समोर आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका रिक्षाचालकाला ताब्यात घेतले आहे. तर मुख्य आरोपी विशाल गवळी फरार आहे.

विशाल गवळीविरोधात आधीच विनयभंगाचे ५ गुन्हे दाखल आहेत. विशालने या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह बापगाव परिसरामध्ये फेकून दिल्याचा पोलिसांना संशय आहे. कोळशेवाडी पोलिसांनी विशाल गवळीच्या शोधात ६ पथकं तयार केली आहे. या घटनेमुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT