Kalyan Murbad Accident News  AI Image
मुंबई/पुणे

Accident News : कल्याण-मुरबाड मार्गावर भीषण अपघात, कारची कंटेनरला धडक, एकाचा मृत्यू

Kalyan Murbad Accident Update News : कल्याण-मुरबाड मार्गावरील रायता पुलाजवळ चारचाकीची उभ्या कंटेनरला जोरदार धडक. भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी.

Alisha Khedekar

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण-मुरबाड मार्गावर रायता पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. चारचाकी गाडीने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी गाडीमधून काही प्रवासी पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. मुरबाडकडून कल्याणच्या दिशेने येत असताना रायता पुलाजवळ चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. पुलाचा अंदाज न आल्याने गाडी थेट सर्व्हिस रोडवर उतरली. याच रस्त्यावर असलेल्या कंटेनरला चारचाकीने जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी जोरात होती की चारचाकीचे मोठे नुकसान झाले. गाडीतील राज बहादूर अमरदेव जयस्वाल यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. तर गाडीमधील अन्य तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघाताची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, तसेच अपघातामागे इतर काही कारण आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. कल्याण-मुरबाड मार्गावर झालेल्या या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे आणि रस्त्यावरील परिस्थितीचा अंदाज घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss: पोटाचा घेर अन् मांड्यांची चरबी कमी करायची आहे? जिममध्ये पैसे घालवण्यापेक्षा घरीच करा या ५ सोप्या गोष्टी!

Maharashtra News Live Update: नंदुरबारमधील करंजी ओवारा परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा नागरिकांवर जीवघेणा हल्ला

भाजप नेत्याची लोखंडी रॉडने वार करून हत्या; घटनेने राजकारणात खळबळ

Railway Employees : सरकारी नोकरी असूनही रेशनवर स्वस्त धान्य घेतलं; १.८२ लाख कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

Plain Saree For Women: महिलांसाठी प्लेन साडीच्या सुंदर डिझाईन्स, डेलीवेअरसाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT