Kalyan Saam
मुंबई/पुणे

Kalyan News: विशाल गवळी मृत्यू प्रकरण; गवळीनं आत्महत्या केली, पीडित मुलीच्या कुटुंबाने केलं 'हे' काम; लेकीच्या फोटोला..

"Justice Served" Accused in Kalyan Minor Physical Assault Case Found Dead in Taloja Jail: १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या विशाल गवळीची तळोजा कारागृहात आत्महत्या; पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केले समाधान.

Bhagyashree Kamble

कल्याणमध्ये काही महिन्यांपूर्वी एका १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी विशाल गवळीची रवानगी तळोजा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. दरम्यान, आरोपी विशाल गवळी आज सकाळी कारागृतच टॉवेलने गळफास घेत आत्महत्या केली.

या घटनेमुळे तळोजा कारागृहात एकच खळबळ उडाली. गवळीचा मृतदेह खासगी रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. विशाल गवळीने आत्महत्या करून आयुष्य संपवल्यानंतर पीडितेच्या कुटुंबाने समाधान व्यक्त केलंय. तसेच मुलीच्या वडिलांनी आपल्या लेकीच्या तसबिरीसमोर दिवा लावला.

माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, "नराधम विशाल गवळीने जे क्रुर कृत्य आमच्या दीदीसोबत केलंय, ते क्षमस्व नाही. यासाठी आम्ही कोर्टात लढा देत होतो. पण देवानेच त्याला शिक्षा दिली आहे. याठिकाणी जशाच तसे न्याय झाला आहे. आम्ही मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी वेळोवेळी सहकार्य आणि पाठिंबा दिला आहे. प्रशासनानेही योग्य काम केलंय", असं पीडित मुलीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी पीडित मुलीच्या वडिलांनी विशाल गवळीच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत, "गवळीचे दोन्ही भाऊ तडीपार आहेत. ते कायम परिसरात दहशत निर्माण करतात. त्यांच्याकडे हत्यारं सुद्धा आहेत. फक्त त्याचे भाऊ नाही तर, त्याचे वडीलही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. आमच्या परिवारावर हल्ला होण्याची शक्यता आहे, अशी भीती पीडित मुलीच्या वडिलांनी बोलून दाखवली.

विशाल गवळीच्या मृत्यूनंतर कल्याण पूर्वेकडील परिसरात "मिस यू दीदी, नराधमाला फाशी झालीच पाहिजे", अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

SCROLL FOR NEXT