Kalyan Marathi Receptionist Case Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News : मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या गोकुळचा मुक्काम तुरुंगातच, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Kalyan Marathi Receptionist Case : कल्याण मराठी तरुणीला झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये आरोपी गोकुळ झा आणि रणजीत झा यांना कल्याण सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Yash Shirke

अभिजीत देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

Kalyan News: कल्याणमध्ये एका मराठी तरुणीला एका परप्रांतीय व्यक्तीकडून अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या मारहाणीमध्ये तरुणीला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी गोकुळ झा याला अटक केली आहे. गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजीत झा या दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमधील मराठी तरुणी मारहाण प्रकरणामधील आरोपी गोकुळ झा आणि रणजीत झा यांना कल्याण सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुख्य आरोपीवर मानपाडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात मुख्य आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

मानपाडा पोलीस स्थानकातील दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांना आरोपीचा ताबा हवा होता. यासाठी पोलिसांनी कल्याण सत्र न्यायालयाकडे विनंती केली होती. पोलिसांच्या मागणीनंतर मानपाड्यातील गुन्ह्याअंतर्गत आरोपीचा ताबा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. आरोपीच्या वकिलाने न्यायालयाकडे सात दिवसांची कोठडी मागितली होती. पण दुसऱ्या गुन्ह्याचा वेगळा तपास करता यावा असे सांगत आरोपीला या गुन्ह्यात पोलीस कोठडी देऊ नये अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिल्याचे म्हटले जात आहे.

गोकुळ झा याचा भाऊ रणजीत झा याचा न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्या अर्जावर सुनावणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या बाजूला, फिर्यादीचे वकील हरीश नायर यांनी पोलिसांवर राजकीय दबाव येत असल्याने तपास होत नसल्याचे म्हणत खंत व्यक्त केली आहे. आरोपी जर सुटून बाहेर आला, तर पीडित मुलीच्या आणि तिच्या बहिणीच्या जीवाला धोका असल्याचे हरीश नायर यांनी म्हटले आहे. मानपाडा पोलीस स्टेशनमधील जीवघेणा हल्ला प्रकरणी आरोपीला कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

11 हजार कॅरेटचा दुर्मिळ माणिक सापडला, म्यानमारच्या खाणीत गवसला मौल्यवान खडा

PM Modi: भारतावर मोठं संकट? वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन मिटिंग सुरू करा; PM मोदींच्या आवाहनामागे काय अर्थ दडलाय?

Maharashtra News Live Update: विहीर कोसळून बाप- दोन मुलांचा मृत्यू

तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी थलपती विजय, विजयच्या शपथविधीला त्रिशाची जादू

Moong Dal Chilla Recipe: सकाळी करा नाश्ता हेल्दी, झटपट बनवा टेस्टी मूग डाळ चिल्ला, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT