Kalyan News  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : खिशातून १,५०,००० रुपयांचा मोबाइल गायब; पठ्ठ्याने बस थांबवून घेतली प्रवाशांची झडती, कल्याणमधील घटना

Kalyan News : कल्याणमध्ये खिशातून १,५०,००० रुपयांचा मोबाइल गायब झाल्यानंतर पठ्ठ्याने बस थांबवून प्रवाशांची झडती घेतली. कल्याणमधील घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

Vishal Gangurde

कल्याणमध्ये बसमधून प्रवास करताना संतोष साळवे याचा 1.5 लाखांचा मोबाईल चोरीला

मोबाईल सापडत नसल्यामुळे त्याने बस थांबवून प्रवाशांची झडती

बसमधील प्रवासी, चालक व वाहक यांची मोठी गैरसोय

वाहतूक कोंडी झाल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

बसमधून प्रवास करताना पठ्ठ्याचा खिशातून महागडा मोबाइल गायब झाला. त्यानंतर संपातलेल्या प्रवाशाने चालकाला बस थांबवण्यास सांगितलं. या प्रवाशाने बस थांबवून प्रवाशांची झडती घेतली. या पठ्ठ्याच्या कृत्याने प्रवासी हैराण झाले. तर रस्त्यावर वाहतूक कोंडी होताच पोलीस बसजवळ पोहोचले. कल्याणमधील या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.

कल्याण रोडवर वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक आधीच हैराण आहेत. याच कल्याणमधील एका अजब प्रकाराची सर्वत्र चर्चा होत आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याण पश्चिम येथील बैल बाजार परिसरात बायकोला माहेरी सोडण्यासाठी एक तरुण बायकोला घेऊन बसमध्ये चढला. मात्र, खिशातून दीड लाखाचा महागडा मोबाईल गायब झाला. मोबाईल गायब झाल्यानंतर पठ्ठ्याने बस अर्ध्या रस्त्यात थांबविली आणि प्रत्येक प्रवाशाची बॅग आणि खिसे तपासायला सुरुवात केली. संतोष साळवे असे प्रवाशाचे नाव आहे.

बस प्रवाशांनी भरलेली होती. संतोष साळवे याला एक-एक करून प्रवासी त्यांची बॅग आणि खिसे तपासण्यासाठी देत होते आणि खाली उतरत होते. वाहतूक कोंडी झाल्याने बाजारपेठ पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी संतोष साळवे याला विचारले तू मोबाईल शोधतोय, मोबाईल मिळाला का? लोकांना हैराण करतोय. तुझी काय तक्रार असेल तर पोलिस ठाण्यात कर. आम्ही शोध घेऊ. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र संतोष साळवे याच्या कृत्यामुळे प्रवासी, बस चालक, वाहक आणि वाहतूक पोलिसांचा खोळंबा झाला. त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coronavirus : कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडला, वटवाघळात ‘क्लेड बी’ विषाणूचा शोध

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा तापमानाचा कहर

Pune : पुण्यात ३० वर्षीय विवाहितेची आत्महत्या; राहत्या घरी घेतला गळफास, कारण अस्पष्ट

Drishyam 3 : अखेर २ ऑक्टोबरचं रहस्य २१ मे ला उलगडणार; 'दृश्यम ३' येतोय, अ‍ॅडव्हान्स बुकिंगला धमाकेदार सुरूवात

Mango Eating Tips: जेवल्यानंतर आंबा खाणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT