Irani Lady Don saam tv
मुंबई/पुणे

Kalyan News: बदनाम गल्लीची लेडी डॉन गजाआड, लेडी डॉनमुळे तरुणाई ड्रग्सच्या विळख्यात, कल्याण पोलिसांची कारवाई|VIDEO

Fiza Irani Arrested:अंडरवर्ल्डमध्ये बेबी पाटणकरचं या ड्रग क्वीनचं नाव ऐकून असाल... मात्र आता एका इराणी लेडी डॉनने धुमाकूळ घातलाय.. दिसायला सुंदर पण कारनामे भयंकर असलेली ही लेडी डॉन कोण आहे? का बेबी पाटणकरची आठवण झाली पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Omkar Sonawane

एकेकाळी मुंबईमध्ये अंडरवर्ल्डची दहशत होती. करीमलाला, हाजी मस्तान, दाऊद, मन्या सुर्वे ते अश्वीन नाईक अशा अनेक गँगस्टरनी मुंबईत आपलं साम्राज्य निर्माण केलं होतं. मात्र अलीकडच्या काळात एका लेडी डॉननं मुंबईजवळ आपली दहशत निर्माण केली आहे. कल्याणच्या गजबलेल्या वस्त्यांमध्ये एक नाव गेल्या अनेक वर्षांपासून गाजतंय. ते म्हणजे कुख्यात इराणी लेडी डॉन फिजाचं... या फिजानं ड्रग्सच्या व्यवसायातून तरुणाईला नशेत बुडवलं आहे. फिजाच्या टार्गेटवर महाविद्यालयीन विद्यार्थी होते. कल्याण डीसीपी स्कॉडने इराणी वस्तीमधून या इराणी लेडी डॉनला बेड्या ठोकल्यात.

आंबिवलीतील इराणी वस्तीची कल्याण परीसरात दहशत आहे. पोलिस देखील तिथं जायला कचरतात अशी चर्चा आहे. अनेक गुन्हेगार गुन्हा करुन या वस्तीत लपून बसतात. लेडी डॉनचं या वस्तीवर वर्चस्व होतं.

या लेडी डॉनचे कारनामे पाहूयात...

आंबिवलीतील इराणी वस्तीत फिजाचे वास्तव्य

स्कुटीवरून कल्याणमध्ये एमडी ड्रग्सची विक्री

फिजाच्या टार्गेटवर महाविद्यालयीन तरुण

सुंदरतेचा फायदा घेऊन उकळायची तरुणांकडून पैसे

फिजामुळे तरुणांना लागले ड्रग्सचे व्यसन

बदनाम गल्लीची लेडी डॉन फिजा इराणी हिला गजाआड केल्यानं तिच्या गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश होणार आहे. कल्य़ाण पोलिसांकडून सखोल तपास सुरु झालाय. फिजाचे साथीदार कोण आहेत? तिला ड्रग्सचा पुरवठा कुठून होते आणि त्याचे वितरण कसे केले जाते हे लवकरच समोर येईल. त्यामुळे कल्याणमधील ड्रग्स रॅकेटचं भीषण वास्तव समोर येईल, हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

SCROLL FOR NEXT