Kalyan Crime news Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: कल्याणमधील अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणाला नवं वळण; 2 आरोपीसह अल्पवयीन मुलंही पोलिसांच्या ताब्यात

Kalyan Crime News: मारहाण करणाऱ्या चार जणांना कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेत या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

Kalyan Crime News: कल्याण पूर्व खडेगोळवली परिसरात काल जुन्या वादातून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने केलेल्या मारहाणीत एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. या मुलाच्या विरोधात याआधी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या मारहाण करणाऱ्या चार जणांना कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात शुक्रवारी संध्याकाळी समीर लोखंडे नावाच्या विधिसंघर्षित अल्पवयीन मुलाला काही तरुण अपहरण करुन घेऊन गेले. त्याला बेदम मारहाण करण्यात आली. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. ज्यामध्ये दोन अल्पवयीन आहेत. तर मुकेश उर्फ विठ्ठल काण्या आणि निरज दास अशी दोन आरोपीची नावे आहेत.

तसेच केडीएमसीचे भाजपचे माजी उपमहापौर विक्की तरे यांच्या निकटवर्तीयाला देखील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनेच्या वेळी तो कोळसेवाडी पोलिस ठाण्यात होता. मात्र, मयत तरुणाने त्याचे फिर्यादीत नाव घेतल्याने त्याचीही चौकशी पोलिसांकडून सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.

या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला त्या समीर विरोधात यापूर्वी अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहे. तो विधीसंघर्षित बालक असल्याने तो जेलमधून बाहेर होता.

हत्या का घडली?

तत्पूर्वी, सध्या कल्याण पूर्वेत गुन्हेगारीचा अड्डा झाला आहे. कल्याण पूर्वेत अभिजीत कुडळकर आणि विशाल उर्फ दही हे दोघे गँग चालवित असल्याची माहिती आहे.

दोघांच्या विरोधात कोळसेवाडी पोलिसांनी कारवाई केली आहे. दोघे जेल मध्ये आहेत. मात्र त्यांच्या हस्तकांमध्ये संघर्ष सुरु असून या दोघांना राजकीय पाठबळ असल्याचे बोलले जातेय. त्यातून हत्येची घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : दारूच्या नशेत विहीरीत उडी; एका व्यक्तीचा मृत्यू, पोलीस येताच गावकरी आक्रमक

Maharashtra Live News Update: सोलापुरात पत्नीचा पतीकडून खून; परिसरात खळबळ

Bonus Called In Marathi: दिवाळीला मिळणाऱ्या बोनसला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहितच नाही?

Diwali Dhanteras : धनतेरसच्या दिवशी धण्याची खरेदी का केली जाते? जाणून घ्या

Shocking News : संतापजनक! शासकीय बाल सुधारगृहात १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT