Kalyan News  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan News : आमदाराचा भाचा असल्याची बतावणी करून वृद्धांना लुटणारा तरुण अखेर गजाआड; मुंबईसह कल्याण-डोंबिवलीत ५० गुन्हे नोंद

Kalyan Crime News : आमदाराचा भाचा असल्याची बतावणी करून वृद्धांना लुटणारा तरुण अखेर गजाआड झाला आहे. या आरोपीवर मुंबईसह कल्याण-डोंबिवलीत ५० गुन्हे नोंद आहेत.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी

कल्याण : 'मी मनसे आमदार राजू पाटील यांचा भाचा आहे, मला ओळखलं का? असे बोलून त्यांना वृद्धांकडून पैसे,सोन्याचे दागिने घेऊन पसार होणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. विजय तांबे असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी या तरुणाला खारघरहून अटक केली आहे. विजय तांबे याच्या विरोधात डोंबिवली ,भिवंडी, नवी मुंबई,मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात ५० गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.

डोंबिवलीतील महात्मा फुले रोड परिसरात राहणारी एक वयोवृद्ध व्यक्तीने त्यांना एका अज्ञात तरुणाने मी मनसे आमदार राजू पाटील यांचा भाचा आहे. मी तुम्हाला त्या दिवशी आमदारांसोबत भेटलो होतो, अशी बतावणी करुन दागिने आणि दहा हजार रुपयांची रोकड घेऊन पसार होणाऱ्या तरुणाविरोधात वृद्ध व्यक्तीने तक्रार नोंदवली होती.

या प्रकरणी डीसीपी सचिन गुंजाळ, विष्णूनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी दिग्विजय भवार यांनी तपास सुरु केला. घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही तपासले. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीत दिसणाऱ्या या तरुणाचा शोध सुरू केला.

तरुण सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला. तो घरी सापडला नाही. पोलिस अधिकारी भवार यांच्या पथकाने विजय तांबे नावाच्या या आरोपीला शोधण्यासाठी अनेक ठिकाणी गेले. विजय तांबे हा खारघर परिसरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत त्याला बेड्या ठोकल्या. याच दोन तासाआधी त्याने नवी मुंबईतील दोघांना बतावणी करत लुटलं होतं. पोलीस तपासादरम्यान त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली.

आत्तापर्यंत ५० पेक्षा जास्त लोकांना गंडा घातला असून विजय तांबे याच्या विरोधात डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई,मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात बतावणी करत लुटल्याचे तब्बल 50 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. विजय तांबे हा असाध्य आजाराने ग्रस्त आहे. त्या आजाराचे त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे. न्यायालयात ते प्रमाणपत्र दाखवून सहानुभूती मिळवतो. त्याला न्यायालयाकडून जामीन मिळतो. जामीनावर सुटल्यानंतर तो पुन्हा लोकांना गंडा घालण्याचे काम करतो, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT