Kalyan News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News : वडिलांच्या उपचारासाठी मुलानं केलं भलतंच काम; आता आली पश्चातापाची वेळ

पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजित देशमुख

Latest Kalyan News : डोंबिवली विष्णूनगर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका चोरट्याला मुरबाड येथून अटक केलीये. वैभव मुरबाडे असे या चोरट्याचे नाव असून वैभव जवळून पोलिसांनी चोरी केलेला पाच लाख 92 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल देखील हस्तगत केलाय. वडिलांच्या उपचाराचा खर्च काढण्यासाठी वैभवने घरफोडीचा मार्ग पत्करल्याचे डोंबिवलीत पोलीस तपासात उघड झाले.

डोंबिवली (Dombivli) पश्चिमेकडील एका इमारती मधील घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार विष्णूनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत या अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला. पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस (police) निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी.ए भवर,अमोल आंधळे यांनी सदर घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

तांत्रिक तपास आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हा चोरटा मुरबाड येथे राहत असल्याची माहिती विष्णूनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपी वैभव मुरबाडे याला मुरबाड येथून अटक केली तसेच त्यांच्याकडून ५ लाख ९२ हजार किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

वडील आजारी असल्याने त्यांच्या उपचारासाठी पैसे कमी पडत असल्याने त्याने चोरी करणे सुरू केल्याचे वैभव ने पोलिसाना सांगितले. दरम्यान याआधी देखील त्याच्यावर एक गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. वैभवने आणखी काही चोऱ्या केल्यात का याचा तपास आता विष्णूनगर पोलीस करत आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Parenting Tips : मुलांना ओरडल्यानंतर पालकांनी चुकूनही करू नका 'ही' चूक, विश्वासाचं नातं एका क्षणात तुटेल

Pune : पुण्यात पोलिसांनीच केले पोलिसांचे 'स्टिंग ऑपरेशन'! डमी डिलिव्हरी बॉय बनवून केला मोठा पर्दाफाश

Actor Home Fraud: मराठमोळ्या अभिनेत्याची २५ लाखांची फसवणूक; न्यायासाठी वर्षभरापासून करतोय धावपळ

Shocking : पनवेल हादरलं! तरुणाने अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात नेले, लैंगिक अत्याचार केले अन्...

SCROLL FOR NEXT