Kalyan Dombivli News Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Dombivli News : 'त्या' ६५ इमारतींच्या प्रकरणात पुन्हा गडबड! ठाकरे गटाच्या नेत्यानं केला भयंकर प्रकाराचा गौप्यस्फोट

Kalyan Dombivli News : कल्याण-डोबिंवलीतल्या ६५ इमारती बेकायदेशीर ठरवल्याने तेथील रहिवाशी चिंतेत आहेत. अशात इमारतींचा बिल्डर पुन्हा त्यांची फसवणूक करत असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे.

Yash Shirke

अभिजीत देशमुख, साम टीव्ही, प्रतिनिधी

Kalyan Dombivli : महारेरा घोटाळ्यामध्ये कल्याण-डोबिंवलीतल्या त्या ६५ इमारतींवर कारवाई होणार आहे. कारवाई होणार असल्याने इमारतींमधील ६५,००० रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हे प्रकरण ठाकरे गटाने लावून धरले आहे. आज डोबिंवलीमध्ये या रहिवाशांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला.

'कल्याण-डोबिंवलीमधल्या रहिवाशांची फसवणूक आजही होत आहे. या इमारतींचा बिल्डर न्यायालयात जाण्याच्या नावाखाली रहिवाशांकडून पैसे गोळा करत आहे. प्रत्येक इमारतीकडून २५ लाख रुपये गोळा करत आहेत. आतापर्यंत बिल्डरने दीड कोटी रुपये रहिवाशांकडून गोळा केले आहेत', असे दीपेश म्हात्रे यांनी म्हटले आहे. या फसवणूकीसंबंधित स्क्रीन शॉर्ट्स म्हात्रे यांनी भरसभेत सादर केले.

builder scam screenshots

उद्यापासून डोंबिवलीतील चार पोलीस स्थानकांमध्ये या प्रकरणी रहिवाशांमार्फत तब्बल अडीच हजार तक्रारी अर्ज दाखल केले जाणार आहे असल्याची माहिती दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे. बनावट पेपर बनवणाऱ्या टोळीच्या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करावी, त्यांना तुरुगांत टाकावे अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.

'६५ इमारतीत राहणाऱ्यांवर अन्याय होत आहे. शिवसेना ठाकरे गट या रहिवाशांसाठी न्यायालयीन लढाई लढणार आहे. आम्ही या प्रकरणात रस्त्यावरही उतरु. आजच्या सभेसाठी सर्व पक्षांना आवाहन केले होते. मात्र सत्ताधारी पक्षातील कोणीही इथे फिरकलं नाही याची खंत वाटते', असे वक्तव्य दीपक म्हात्रे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, इंजिनिअर्सच्या मागण्या पूर्ण होणार? वाचा सविस्तर...

High Blood Pressure: ब्लड प्रेशर मोजताना तुम्हीही ही एक चूक करताय का? डॉक्टरांनी सांगितलेली योग्य पद्धत जाणून घ्याच

Accident News : भयंकर अपघात! ३१ मजुरांनी खचाखच भरलेला पिकअप महामार्गावर उलटला, ४ जणांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: करमाळ्यात पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीचा स्लॅब कोसळला.

साताऱ्यातील प्रसिद्ध 5 धबधबे, पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य पाहून प्रेमात पडाल

SCROLL FOR NEXT