Kalyan Crime News CCTV Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime: सुरक्षा रक्षकांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, कल्याणमध्ये खळबळ; घटना CCTV मध्ये कैद

Kalyan Crime News CCTV: कल्याणमध्ये सुरक्षा रक्षकांनी केलेल्या मारहाणीमध्ये तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आले आहे.

Priya More

अभिजित देशमुख, कल्याण

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी अतंर्गत सुरु असलेल्या पूलाच्या कामासाठी रस्त्यावर बॅरिकेटिंग करण्यात आली होती. या दरम्यान एका तरुणाला खासगी सुरक्षा रक्षकाने त्या दिशेने जाण्यासाठी मज्जाव केला. या कारणावरून सुरक्षारक्षक आणि त्या तरुणामध्ये वाद झाला. सुरक्षा रक्षकाने तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. राजकुमार यादव असे मृत तरुणाचे नाव आहे. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या आधारे पळून गेलेल्या राहुल शिंदे, सचिन शिंदे आणि विजय ढांगे या ३ सुरक्षा रक्षकांना बेड्या ठोकल्यात.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेला स्टेशन परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत स्टेशन परिसरात उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. रात्री ११ ते पहाटे ५ वाजताच्या दरम्यान हे काम सुरु असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव पूलाखालील रस्त्यावर काही ठिकाणी बॅरिकेटिंग करत कोणती दुर्घटना घडू नये यासाठी लोकांना ये जा करण्यासाठी मज्जाव करण्यात येतो . सोमवारी मध्यरात्री पूलाचे काम सुरु होते. या दरम्यान एक तरुण बॅरिकेटिंगच्या दिशेने आला. त्याला त्याठिकाणी असलेल्या खासगी सुरक्षा रक्षकाने अडवले आणि त्याठिकाणी जाण्यासाठी मज्जाव केला. यावरुन राजकुमार यादव आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाला.

वादाचे रुपांतरण हाणामारीत झाले. या दरम्यान राजकुमार हा खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तो बेशुद्ध पडला. हे पाहून मारहाण करणारे सुरक्षा रक्षक घाबरून पळून गेले. राजकुमार यादव हा मूळचा बंगालचा असून तो सध्या मालाड येथे राहत होता. काही कामानिमित्त तो कल्याणला आला होता. तेव्हा ही धक्कादायक घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले पोलिस त्याठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये ही घटना कैद झाल्याचे दिसले. सीसीटीव्ही फूटेजमध्ये ३ सुरक्षा रक्षक राजकुमारला मारहाण करताना दिसून आले. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आणि तिघांना तीन तासांच्या आत अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral video mumbai: मुंबईतील मुलुंड स्टेशनवर घडला धक्कादायक प्रकार, रूळांवर उतरून दोन तरुणांची हाणामारी

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

खाकीने ओलांडली मर्यादा! पोलीस ठाण्यातच ASI कडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी; हादरवणारा व्हिडिओ समोर

Badishep Water Benefits: कडाक्याच्या उन्हाळ्यात रोज सकाळी बडीशेप पाणी पिण्याने मिळतील 'हे' आरोग्यदायी फायदे

School Holidays: पालकांसाठी महत्त्वाची बातमी! एप्रिल महिन्यात इतके दिवस शाळांना सुट्टी; वाचा यादी

SCROLL FOR NEXT