Kalyan Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: धक्कादायक! जुन्या रागातून दोन तरुणांवर भर रस्त्यात तलवारीने वार, घटना सीसीटीव्हीत कैद

जुन्या रागातून दोन तरुणांवर भर रस्त्यात तलवारीने वार, घटना सीसीटीव्हीत कैद

Satish Kengar

>> अभिजित देशमुख

Kalyan Crime News : जुन्या वादातून फिल्मी स्टाईलने पाठलाग करत चार जणांनी भर रस्त्यात तलवारीने वार करत दोन तरुणांना जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास कल्याण नांदीवली परिसरात घडली.

या हल्ल्यात अक्षय कवडे व अविनाश झा हे दोन तरुण जखमी झाले आहेत. तर या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात खंजीर उर्फ कुलदीप, राकेश हाजरा, मनीष चौहान, मुकेश हाजरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेकडील आडीवली परिसरात अक्षय कवडे व अविनाश झा हे दोन तरुण राहतात. दोन वर्षांपूर्वी अक्षय कवडे याचे मनीष चव्हाण व राकेश हाजरा या दोघांसोबत वाद झाले होते. काल मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अक्षय कवडे व त्याचा मित्र अविनाश झा हे रिक्षाने मलंग रोडहून घराच्या दिशेने जात होते.  (Crime News)

याच दरम्यान नांदीवली परिसरातील मेडिकल जवळ उतरून हे दोघे त्यांच्या एका मित्राशी बोलत होते. याचवेळी राकेश हाजरा व त्याचा मित्र खंजीर उर्फ कुलदीप हे दोघे मोटरसायकलवर त्यांच्यादिशेने आले. त्यांच्या दुचाकीवर सफेद रंगाची गोणी होती. अक्षयला पाहताच खंजीर उर्फ कुलदीपने गोणीतून जमिनीवर फेकली व या गोनीतून तलवार काढत तलवारीने अविनाशवर हल्ला केला.

त्याचवेळी मुकेश हाजरा याने अक्षय वर देखील तलवारीने हल्ला केला. तर मुकेश चा साथीदार मनीष चौहान याने अविनाश व अक्षयला दगड फेकून मारले. या हल्ल्यात अविनाश व अक्षय हे दोघे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  (Latest Marathi News)

हा संपूर्ण फिल्मी स्टाईल थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनुसार कोळसेवाडी पोलिसांनी खंजीर उर्फ कुलदीप, राकेश हाजरा, मनीष चौहान, मुकेश हाजरा या चौघां विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watermelon Storage Tips: कापलेला कलिंगड फ्रिजमध्ये ठेवायचा की नाही? जाणून घ्या

Post Office Scheme : १ लाख गुंतवा अन् ₹४५,००० मिळवा व्याज; पोस्टाची भन्नाट योजना आताच करा नोट

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवारांकडून सभा स्थळाची पाहणी, बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता सभा

Crime News : तरुणाने लैंगिक अत्याचार केले, धर्मांतरासाठी दबाव टाकला; बीडमधील महिलेसोबत भयंकर घडलं

Trendy Blouse Designs: साडीवर लूक दिसेल अप्सरेसारखा! ऑफशोल्डर ते बॅकलेस ब्लाऊजचे हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT