Kalyan Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News : कल्याणमध्ये रक्तरंजित थरार! क्षुल्लक कारणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला, ब्लेडने गळ्यावर केले सपासप वार

Latest Crime News Today: धक्कादायक! कल्याणमध्ये क्षुल्लक कारणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला, ब्लेडने केले सपासप वार

Satish Kengar

>> अभिजित देशमुख

Latest Crime News Today : कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे काही तरुणांनी क्षुल्लक वादातून एका तरुणावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास कल्याण पूर्वेकडील नवी गोविंदवाडी परिसरातील बीएसयूपी मधील बंद इमारतीमध्ये ही घटना घडली आहे.

साजिद शेख असं जखमी तरुणाचं नाव असून हल्लेखोर तरुण पसार झालेत. साजिदला उपचारासाठी कळवा येथेल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय. (Latest Marathi News)

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान गोविंदवाडी परिसरातील पालिकेच्या बीएसयुपी मधील बंद इमारती आता गुन्हेगारांचा अड्डा बनल्याचे दिसून येतेय. याआधी देखील अशा अनेक घटना या ठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे या इमारती मध्ये सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व भागात बीएसयूपी प्रकल्पातील घरे बांधून तयार आहेत. ही घरे लाभार्थीना देणो बाकी आहे. ही घरे बरीच वर्षे झाली तरी वापरात नसल्याने धूळ खात पडली आहेत. या घरांमध्ये नशाबाज तरुण रात्रीच्या वेळी अड्डा जमावित त्याठिकाणी नशापान करतात. या बंद इमारती मधील घरे गुन्हेगार, गरदुल्ल्याचे, नशेबाज तरुणांचा अड्डा बनल्या आहेत.

आज सकाळच्या सुमारास काही तरुण या इमारतीमध्ये आले. त्यांच्यात काही वाद झाले. एक तरुणाने दुसर्या तरुणावर धारदार शस्त्रने हल्ला केला. या हल्ल्यात साजिद शेख हा तरुण जखमी झालेला आहे. त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

SCROLL FOR NEXT