Kalyan News saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan News: ...अन्यथा आम्हीदेखील पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या फोटोला जोडे मारू; काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा इशारा

Kalyan News: तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती यांची मिमिक्री केली होती. त्यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्हिडिओ काढला. या घटनेनंतर राज्यातील भाजप आक्रमक झाली. आता कल्याण काँग्रेस आक्रमक झालीय.

Bharat Jadhav

(अभिजीत देशमुख)

Kalyan News:

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारणाऱ्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात कारवाई करा. नाहीतर आम्हीही पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्या फोटोला जोडे मारणार, असा इशारा कल्याण काँग्रेसच्या वतीने कल्याण कोळशेवाडी पोलिसांना देण्यात आलाय. कल्याण डोंबिवली जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महिला काँग्रेस अध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वात कोळशेवाडी पोलिसांची भेट घेत हा इशारा दिलाय. (Latest News)

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती यांची मिमिक्री केली होती. त्यादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्हिडिओ काढला. या घटनेनंतर राज्यातील भाजप आक्रमक झाली. गुरुवारी संध्याकाळी कल्याण पूर्वेत भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याण बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मार आंदोलन करत घटनेच्या निषेध केला. या आंदोलनानंतर आता कल्याण काँग्रेस आक्रमक झालीय.

कल्याण काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पोटे,उपाध्यक्ष विनोद तिवारी महिला अध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्या नेतृत्वात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या फोटोला जोडेमाल आंदोलन करण्यात आले हे अतिशय चुकीचे आहे. जोडे मारो आंदोलन करणाऱ्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे.

पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही तर काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या फोटोला देखील आम्ही जोडे मारणार, असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. याबाबत काँग्रेस महिला अध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी सांगितले की,काल भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि त्यांचे जिल्हाध्यक्षांनी जोडे मारो आंदोलन केलं. राहूल गांधी यांनी सॉफ्ट टार्गेट केलंय. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत आम्ही आज कोळशेवाडी पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT