Kalyan : चुकीची औषधे दिल्याने चिमुकलीचा मृत्यू; डॉक्टरसह एकावर गुन्हा दाखल!  प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Kalyan : चुकीची औषधे दिल्याने चिमुकलीचा मृत्यू; डॉक्टरसह एकावर गुन्हा दाखल!

कल्याण मध्ये उपचारादरम्यान एका दीड वर्षीय मुलीचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर कल्याण मधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात डॉक्टर एस.ए.आलम व ताज अन्सारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण मध्ये उपचारादरम्यान एका दीड वर्षीय मुलीचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुलीच्या कुटूंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. मात्र, ठोस कारवाई न झाल्याने आई वडिलांनी या प्रकरणात कल्याण न्यायालायत धाव घेतली. अखेर कल्याण न्यायालयाने संबंधित डॉक्टर आणि त्याच्या एका सहकाऱ्यावर कलम 304 प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

हे देखील पहा :

न्यायालयाच्या आदेशानंतर कल्याण मधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात डॉक्टर एस.ए.आलम व ताज अन्सारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात हे दोघे क्लिनिक चालवत आहेत.

ताज अन्सारी हा डॉक्टर एस.ए.आलम यांच्या लेटरहेड चा वापर करून रुग्णाला चुकीचे औषध देत होता. तसेच फिर्यादी यांच्या मुलीला चुकीचे उपचार दिल्याने तिचा मृत्यु झाल्याचा आरोप मृत चिमुकलीच्या आईवडिलांनी केला होता. त्यांच्या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपास सुरू केला आहे. आता या प्रकरणात पोलीस काय तपास करतात व आरोपींविरुद्ध काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT