Kalyan News BJP Shivsena Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Politics : कल्याणमध्ये शिंदे गट-भाजपमध्ये धुसपूस? आमदार गायकवाडांच्या पत्नीच्या राजकीय एन्ट्रीने चर्चांना उधाण

Kalyan Political News in marathi : आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळतं आहे. यामुळे चर्चांना राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, कल्याण

Kalyan Political News :

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर या प्रकणातील आरोपी त्यांचा मुलगा वैभव गायकवाड फरार आहे. तर दुसरीकडे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

शिंदे गट शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड तळोजा कारागृहात आहेत. तर याच प्रकरणातील आरोपी त्यांचा मुलगा वैभव गायकवाड फरार आहे. आमदार गणपत गायकवाड कल्याण पूर्व मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले होते. मात्र गोळीबाराच्या घटनेनंतर कल्याण पूर्व मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार झाला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गोळीबाराच्या घटनेनंतर दुसरीकडे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड या सध्या मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरापासून सुलभा गायकवाड यांच्या हस्ते कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील आमदार गायकवाड यांच्या निधीतून मंजूर विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी भाजप कार्यकर्त्यांकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या राजकारणात सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे. याबाबत सुलभा गायकवाड यांनी बोलताना पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण करतेय असे सांगितलं.

दरम्यान, विकासकामांच्या भूमिपूजनाच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो नसल्याचे समोर आले आहे. या बॅनरवरून प्रश्न विचारला असता सुलभा गायकवाड म्हणाल्या, भाजपचा कार्यक्रम आहे स्थानिक कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले. त्यामुळे हेतू परस्पर काही केल्याचा विषय नाही. भाजपच्या प्रोटोकॉल प्रमाणे हे फोटो लावलेत हा भाजपाचा बॅनर आहे, असे सांगितले. तर अजित पवार यांचा फोटो असल्याचे निदर्शनास आणून देत असताना अधिक बोलणे टाळले.

दरम्यान, गोळीबाराच्या घटनेनंतर भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो बॅनरवर लावणार नसल्याची भूमिका घेतल्याची चर्चा होती. त्यानंतर आज भाजपकडून लावण्यात आलेल्या विकास कामांच्या भूमिपूजनाच्या बॅनरमध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो वगळण्यात आल्याने चर्चेला उधाण आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT