Kalyan Ring Road Accident News Saam Tv
मुंबई/पुणे

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

Kalyan Ring Road Accident News : कल्याण पश्चिमेतील गांधारी वडवली रिंग रोडवर बेकायदेशीर कार रेसिंगमुळे भरधाव वाहनाची धडक बसून व्यावसायिक गंभीर जखमी. चालक फरार असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू; नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी

Alisha Khedekar

  • कल्याण रिंग रोडवर बेकायदेशीर कार रेसिंगमुळे अपघात

  • भरधाव कारची धडक बसून व्यावसायिक गंभीर जखमी

  • पोलिसांकडून शोध सुरू

  • कठोर कारवाईची मागणी

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण पश्चिम येथील गांधारी वडवली रिंग रोड हा नवा कोरा आणि गुळगुळीत रस्ता सध्या कार रेसिंग आणि मोटारसायकल स्टंटबाजीचा हॉटस्पॉट बनला असून स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भरधाव वेगाने सुरू असलेल्या बेकायदेशीर रेसिंगमुळे अपघातांची मालिका सुरूच असून परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

काल रात्री दुकान बंद करून घरी जात असलेल्या सुमारे ५० वर्षीय व्यावसायिकाला रेसिंग सुरू असलेल्या अज्ञात भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघातात संबंधित व्यावसायिकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे. मात्र, वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

स्थानिक रहिवाशांच्या मते, रात्री उशिरा या रिंग रोडवर तरुणांकडून कार रेसिंग व बाईक स्टंटबाजी केली जाते. वेगमर्यादेचे उल्लंघन, सायलेंसरचा कर्कश आवाज आणि वाहतूक नियमांची पायमल्ली यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही पोलिसांची नियमित गस्त किंवा ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जखमी व्यावसायिकाच्या कुटुंबीयांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

निर्दोष नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या स्टंटबाजांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा अशा घटना थांबणार नाहीत, अशी प्रतिक्रिया जखमीं असलेल्या व्यवसायिकांच्या मुलगा श्रेयश कुंभार यांनी दिली. दरम्यान, या रस्त्यावर स्पीड ब्रेकर, सीसीटीव्ही कॅमेरे, नियमित पोलिस गस्त आणि वेगमर्यादेची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT