डोंबिवली पाठोपाठ कल्याण मध्ये 8 वर्षीय मुलीवर लैगिंक अत्याचार Saam TV
मुंबई/पुणे

डोंबिवली पाठोपाठ कल्याण मध्ये 8 वर्षीय मुलीवर लैगिंक अत्याचार

डोंबिवलीत 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली होती.

साम टिव्ही ब्युरो

प्रदिप भणगे

कल्याण: डोंबिवली पाठोपाठ कल्याण मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका आठ वर्षीय मुलीवर शिक्षकाने केला लैगिंक अत्याचार केले आहेत. क्लासचा शिक्षक मुदर तालवाला याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. दीड महिन्यापासून मुदर अत्याचार करीत होता. मुदरची पत्नी माहेरी गेली असता मुदर मुलीची ट्यूशन घेत होता.

दरम्यान सकाळीच संस्कृतीक शहरात काळिमा फासणारी घटना घडली होती. डोंबिवलीत 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे डोंबिवली हादरली होती. त्यानंतर आता कल्याणमध्ये धक्कादायक घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी दोन अल्पवयीन मुलांसह 26 जणांना ताब्यात घेतलं आहे.

आरोपींना 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपिंमध्ये राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांची नातेवाईक असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे. प्रियकराने जानेवारी महिन्यात पीडित मुलिवर बलात्कार करत व्हिडियो काढला. या व्हिडिओच्या आधारे पीडित अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करत तिच्यावर 29 जणांनी बलात्कार केल्याचे सध्या समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

ठेकेदारासाठी आमदाराची आयुक्तांना धमकी? कोट्यवधींच्या कामासाठी आमदाराला हवा मर्जीतला ठेकेदार?

Mumbai Accident : मुंबईच्या पॉश एरियात भीषण अपघात, भरधाव कारने तिघांना उडवले, पत्नीच्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

SCROLL FOR NEXT