Leopard Sterilisation Saam Tv
मुंबई/पुणे

Leopard Sterilisation: वन्यजीव-मानव संघर्ष वाढणार? बिबट्यांच्या नसबंदीला केंद्राचा नकार, जुन्नरकरांचं टेंशन वाढलं

Junnar Leopard Attack Issue: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट आणि मानव संघर्ष तीव्र झालाय. बिबट्यांची संख्या वाढल्याने जुन्नर, शिरुर, खेड आणि आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत आहे.

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

जुन्नर तालुक्यात मानव-बिबट्या संघर्ष टोकाला गेलाय. त्यातच बिबट्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्यांचे मृत्यू होत असल्याने बिबट्यांची संख्या रोखण्यासाठी बिबट्याची नसबंदी हाच पर्याय असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लोकसभा निवडणूकीत म्हटलं होतं. मात्र बिबट्यांच्या नसबंदीचा राज्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं फेटाळून लावल्याची माहिती सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत दिलीय...

'राज्याचा प्रस्ताव केंद्रानं फेटाळला'

पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव आणि शिरुर तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यात 36 लोकांचा मृत्यू झालाय. तर 108 लोक गंभीर जखमी झालेत.

याबरोबरच बिबट्यांनी 12 हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांची शिकार केलीय. त्यामुळे पुणे जिल्ह्यात बिबट्याची मोठी दहशत पसरलीय. गेल्या 25 वर्षात बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ होत चाललीय...

  • 2001- 15 ते 20 बिबटे

  • 2005- बिबट्यांची संख्या 100 पार

  • 2008-2010- बिबट्याचे वावरक्षेत्र वाढलं

  • 2013-2015- बिबट्यांची संख्या 300 पार

  • 2018-19- बिबट्यांची संख्या 450 पार

  • 2022- बिबट्यांची संख्या 550 पार

  • 2023-24- बिबट्यांची संख्या 700 पार

केंद्राने बिबट्यांच्या नसबंदीची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार आणि जुन्नरमधील नागरिकांना कसा दिलासा देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण बिबट्यांच्या हल्ल्याचे पडसाद लोकसभा निवडणूकीला उमटले. मात्र विधानसभा निवडणूकीपुर्वी ठोस उपाययोजना न केल्यास पुणे जिल्ह्यातील बिबट्या महायुतीला घायाळ करण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शाहू महाराजांचा मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला पाठिंबा

भर उन्हात मनोज जरांगे इकडे उपोषणाला बसले; तिकडे मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला

Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर भयंकर घडलं! अक्कलकोटला निघालेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात

Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी'च्या गर्जनेनं बॉक्स ऑफिस हादरलं; महिनाभर फक्त रितेश भाऊंचा बोलबाला, चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमावला?

RCB vs GT, IPL Final : प्रिन्स अन् किंग भिडणार... गुजरातच्या मैदानात आरबीसी कमाल करणार का? पाहा संभाव्य प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT