PUNE ACCIDENT Saam Tv News
मुंबई/पुणे

Accident News: नव वर्षाच्या शुभेच्छा देऊन कुटुंब मुंबईला निघालं, वाटेतच मृत्यूनं गाठलं; कार- दुचाकीच्या अपघातात तिघांचा अंत

Accident News in Pune: नव वर्षाच्या सुरूवातीलाच जुन्रर तालुक्यात झालेल्या अपघातामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक बसल्यानं अख्ख्या कुटुबांवर अपघातानं घाला घातला आहे.

Bhagyashree Kamble

रोहिदास गाडगे, साम प्रतिनिधी

नव वर्षाच्या सुरूवातीलाच जुन्रर तालुक्यात झालेल्या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक बसल्यानं अख्ख्या कुटुबांवर अपघातानं घाला घातला आहे. या भीषण अपघातात अख्ख्या कुटुंबाचा अंत झाला. हे कुटुंब सुट्टी संपवून मुंबईला आपल्या घरी निघाले होते. मात्र, वाटेतच मृत्यूनं गाठलं. या घटनेनंतर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नव वर्षाची सुरूवात अपघाताच्या सत्रानेच सुरू झाली आहे. जुन्नर तालुक्यातील नगर कल्याण महामार्गावर सीतेवाडी फाट्याजवळ एक भीषण अपघात घडला. कार आणि दुचाकीची धडक समोरासमोर बसल्यानं भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबाचा जागीच मृत्यू झाला आहे.

नगर कल्याण महामार्गावर सीतेवाडी फाट्याजवळ दुचाकी आणि कारची धडक बसली. ही धडक इतकी जबर होती की, यात दुचाकीवरून प्रवास करणा-या एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. निलेश कुटे,जयश्री कुटे मुलगी श्रावणी कुटे असं मृत लोकांचे नाव आहे. हे कुटुंब नव वर्षानिमित्त मुंबईहून पिंपरी पेंढार येथे गावी सुट्टी आणि नव वर्ष साजरा करण्यासाठी गेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंब पिंपरी पेंढार या आपल्या गावावरून सर्वांना नव वर्षाच्या शुभेच्छा देऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. कुटुंब दुचाकीवरून जात होती. दुचाकी कल्याणच्या दिशेने जात असताना, समोर आलेल्या कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक बसली. ही धडक इतकी जबर होती, निलेश आणि त्यांचे कुटुंब रस्त्यावर आदळले. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

नव वर्षाच्या सुरूवातीलाच अपघाताची घटना घडल्यानं जुन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, पती पत्नीसह चिमुकल्या मुलीचा देखील अपघाती मृत्युमुळे दु:ख व्यक्त करण्यात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father shot: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाडल्या गोळ्या; २ तरुणांनी केला हत्येचा प्रयत्न

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT