Vaibhav Kadam Status
Vaibhav Kadam Status Saam TV
मुंबई/पुणे

Vaibhav Kadam News: 'एका घटनेमुळे माझ्या आयुष्याची वाट लागली...' जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डचे जीवन संपवण्याआधीचे 7 स्टेटस

विलास काटे

Thane News : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा माजी सुरक्षारक्षक वैभव कदम यांच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. ठाण्यातील अनंत करमुसे मारहाण प्रकरणात वैभव कदम आधी आरोपी होते. वैभव कदम यांनी आत्महत्येपूर्वी सात व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले होते.

वैभव कदम यांच्या स्टेटसवरून ते तणावात असल्याचा अंदाज येत आहे. मी डिप्रेशनमुळे आत्महत्येचा निर्णय घेत असल्याचंही त्यांनी आपल्या स्टेटसमध्ये लिहिलं आहे. आज सकाळी 9 वाजताच्या दरम्यान त्यांनी हे स्टेटस ठेवले होते. (Thane News )

वेभव कदम यांचे शेवटचे सात स्टेटस?

  1. मी डिप्रेशनमुळे हा निर्णय घेत आहे.

  2. यामध्ये कुणालाही दोष देऊ नका.

  3. साक्षी मला माफ कर, स्वर मला माफ कर. आई-पप्पा मला माफ करा. मी खरंच चांगला नवरा, बाप, मुलगा, भाऊ होऊ शकलो नाही.

  4. पण त्यात कुणाचाही दोष नाही.

  5. स्वर मला माफ कर.

  6. एका घटनेमुळे माझ्या आयुष्याची वाट लागली.

  7. पोलीस आणि मीडियाला माझी एकच विनंती आहे, मी आरोपी नाही. (Live Marathi News)

वैभव कदम हे नवी मुंबईमधील निळजे ते तळोजा दरम्यान ते जखमी अवस्थेत आढळले होते. त्यांना ठाण्यातील सिव्हिल रुग्णालय येथे आणले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ठाणे लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.वैभव यांच्या जवळ कुठलही सुसाईड नोट सापडलेली नाही, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

West Bengal News: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक छळाचा आरोप; कर्नाटकचे खासदार प्रज्ज्वल रेवन्नाविरोधात लुकआउट नोटीस जारी

Jayant Patil: ... तर पंचाईत होईल, जयंत पाटील यांचा विश्वजित कदम यांना इशारा; नेमकं काय म्हणाले?

Pune Traffic News: पुण्यातील वाहतुकीत ४ मे पासून मोठे बदल; अनेक रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

Baramati Lok Sabha: सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस, नेमकं कारण काय?

Maharashtra Politics: फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनीही थोपटले दंड; माढ्याच्या मैदानात आरपारची लढाई

SCROLL FOR NEXT