Vaibhav Kadam Saam TV
मुंबई/पुणे

Thane News : धक्कादायक! जितेंद्र आव्हाडांच्या बॉडीगार्डने अचानक संपवलं जीवन

Jitendra Awhad Bodyguard Dies: अनंत करमुसे मारहाण प्रकरणात माफीचा साक्षीदार बनायची तयारी त्यांनी दर्शवली होती

सूरज सावंत

Thane News : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा माजी सुरक्षारक्षक वैभव कदम यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील करमुसे मारहाण प्रकरणात वैभव कदम आधी आरोपी होते. मात्र आता त्यांच्या अचानक आत्महत्येने खळबळ उडाली आहे.

वैभव कदम यांनी आज सकाळी निळजे ते तळोजा दरम्यान रेल्वे लाईनवर जीनव संपवलं. सकाळी 9 वाजताच्या सुमारास लोहमार्ग पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

जितेंद्र आव्हाड यांच्यासंदर्भातील आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याचा अनंत करमुसेवर आरोप होता. या प्रकरणानंतर आव्हाडांच्या काही पोलीस अंगरक्षकांसह खासगी कार्यकर्त्यांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या ‘नाद’ बंगल्यावर नेले होते. तिथे आव्हाड यांच्यासमोरच त्यांना फायबरच्या काठीसह लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याचा आरोप आहे. (Live Marathi News)

याप्रकरणी ६ एप्रिल 2020 रोजी वर्तकनगर पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये मुंबई सुरक्षा दलातील हवालदार वैभव कदम, सुरेश जनाठे तसेच ठाणे मुख्यालयातील पोलीस शिपाई सागर मोरे हे तीन पोलीस कर्मचारी तसेच अभिजित पवार, समीर पवार, हेमंत वाणी, सूरज यादव, ज्ञानोबा वाघमारे, दिलीप यादव या खासगी कार्यकर्त्यांसह १२ जणांना अटक झाली होती.

मोहित कंबोज यांचे गंभीर आरोप

वैभव कदम यांच्या आत्महत्येनंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी गंभीर आरोप केला आहे. पोलीस हवालदार वैभव कदम यांची हत्या झाल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे.

एवढ्या मोठ्या हायप्रोफाईल प्रकरणातील आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाला. राज्यात अजून एक मनसुख हिरेन आणि सुशांत सिंग राजपुत सारखं प्रकरण झाल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून तात्काळ FIR दाखल करावा, अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे स्व. आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी दाखल

Urmila Matondkar: मराठमोळ्या उर्मिला मातोंडकरचा दिवाळी स्पेशल ग्लॅमर्स लूक, पाहा खास PHOTO

फलटणच्या डॉक्टर महिलेला कोण प्रेशराइज करत होतं; साम टीव्हीच्या हाती लागलेल्या त्या पत्रात खळबळजनक माहिती

...तर फलटणच्या डॉक्टर महिलेचा जीव वाचू शकला असता

जैन बोर्डिंग जागा विक्री प्रकरणी अपडेट, केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या अडचणी वाढणार? चेंडू थेट पंतप्रधानांच्या कोर्टात

SCROLL FOR NEXT