Kalyan: ज्वेलर्स मालकाने 24 जणांना दीड कोटीचा घातला गंडा! स्वस्तात सोने देण्याचं आमिष Saam Tv
मुंबई/पुणे

Kalyan: ज्वेलर्स मालकाने 24 जणांना दीड कोटीचा घातला गंडा! स्वस्तात सोने देण्याचं आमिष

कल्याणमध्ये एका ज्वेलर्सने परताव्याचे आमिष दाखवून ग्राहकांना लुबाडल्याची घटना समोर आली

प्रदीप भणगे

मुंबई: कल्याणमध्ये (Kalyan) एका ज्वेलर्सने (Jewelers) परताव्याचे आमिष दाखवून ग्राहकांना (customers) लुबाडल्याची घटना समोर आली आहे. मे एस कुमार गोल्ड अन्ड डायमंड या कल्याण (Kalyan) पश्चिमेकडील ज्वेलर्सने 4 वर्षाच्या कालावधीत ग्राहकासाठी मासिक भिशी योजना, फिक्स्ड डीपोझीट योजना यासारख्या योजनांच्या माध्यमातून 15 ते 18 टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवत 24 जणांची 1 कोटी 56 लाख 74 हजार 539 रुपयाची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

हे देखील पहा-

या प्रकरणी 24 ग्राहकांनी केलेल्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस (Police) फरार संचालक पिल्लईचा पोलीस शोध घेत आहेत. आत्ता हे शोरुम बंद झाला आहे. शोरुम बंद करुन शोरुमचा मालक श्रीकुमार पिल्लई हा पसार झाला आहे. देशभरात एस. कुमार ज्वेलर्सचे 13 शोरुम असल्याची माहिती समोर आली आहे. महात्मा फुले पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

यापूर्वी देखील काही ज्वेलर्स कडून स्कीम च्या नावाखाली पैसे गुंतवणूक करून घेत ग्राहकांना गंडा घातल्याची घटना समोर आले आहेत. ग्राहक देखील जादा परताव्याच्या आमिषाला भुलून अशा ठिकाणी गुंतवणूक करतात. त्यामुळे आता ग्राहकांना देखील अशा योजनांची शहानिशा करत गुंतवणूक करने देखील तितकेच गरजेचे आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earphone : जास्त हेडफोन वापरल्याने व्हाल बहिरे! कसा कराल सुरक्षित वापर

Crime: पुण्याला 'भाभी'च्या घरी जाते सांगून घराबाहेर पडली, नंतर लॉजमध्ये आढळला निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह; नेमकं काय घडलं?

Helmet Buying Tips: हेल्मेट घेताय? या 7 गोष्टी लक्षात ठेवाच

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत; जलद मार्गावरील वाहतूक ठप्प, सध्या परिस्थिती काय?

Maharashtra News Live Update: मस्जिद बंदर स्थानकात तांत्रिक बिघाड; प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास

SCROLL FOR NEXT