Jejuri Warkari Accident  Saam Tv
मुंबई/पुणे

Jejuri Accident: विठूरायाच्या भक्तीत तल्लीन, अचानक ट्रकने वारकऱ्यांना चिरडलं; जेजुरी अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

Jejuri Warkari Accident Video: जेजुरीमध्ये वारकऱ्यांना भरधाव ट्रकने चिरडलं. या अपघातामध्ये ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला. या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More
  • जेजुरीत वारकऱ्यांना ट्रकने चिरडलं

  • अपघातामध्ये ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू

  • या अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे

  • अपघातामध्ये जखमी झालेल्या चौघांवर उपचार सुरू आहेत

आषाढी वारीदरम्यान जेजुरीमध्ये वारकऱ्यांवर काळाने घाला घातला होता. भरधाव ट्रकने वारकऱ्यांना चिरडलं होतं. या अपघातामध्ये ३ महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताप्रकरणी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस सध्या अपघाताची कारण शोधली जात आहेत.

जेजुरीमध्ये वारकऱ्यांवर काळाने घाला घातला. रंगनाथ महाराज पोखरबिशीकरांच्या दिंडीच्या ट्रकने पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना धडक दिली. हे वारकरी विठूरायाच्या भजनात तल्लीन झाले होते. हातात टाळ वाजवत हे सर्वजण भजत म्हणत पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. त्याचवेळी अचानक पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. चाकाखाली चिरडल्यामुळे या अपघातामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले होते. जखमींमधील ३ महिला वारकऱ्यांचा जास्त रक्तस्राव झाल्यामुळे जागीच मृत्यू झाला. तर ४ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जेजुरी वारीतल्या अपघाताचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. अचानक पाठूमागून येणारा ट्रक वारकऱ्याने चिरडत नेलं. त्यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. किंचाळ्या आणि आरडाओरड्याने संपूर्ण संपूर्ण परिसरत हादरून निघाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. नंदा पवार (वय ६० वर्षे), माधवी राजाराम सालगरे (५५ वर्षे), राजश्री शंकर भोसले (५५ वर्षे) अशी अपघातामध्ये मृत्यू झालेल्या महिला वारकऱ्यांची नावं आहेत. त्या सर्व जण सांगली जिल्ह्यातल्या मिरजमधील कसबे दिग्रज गावच्या होत्या.

या अपघातामध्ये मृत झालेल्या वारकऱ्यांच्या नातेवाईकांना ४ लाखांची मदत जाहीर करण्यात आली. उपचार सुरू असणाऱ्या वारकऱ्यांनाही १५ हजारांची मदत देण्यात आली आहे. 'या अपघाताला ट्रक चालक जबाबदार असून त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला ट्रक कंट्रोल करता आली नाही. पुढील काळामध्ये वारीतील नियोजन योग्य पद्धतीने करण्यात येईल. ४ वर्षांमध्ये कुठलाही अनुचित प्रकार वारीमध्ये घडला नाही. आता जो अपघात घडला आहे त्याला ड्रायव्हर जबाबदार असून मृत आणि जखमी वारकऱ्यांवरती शासकीय मदतीने उपचार केले जातील.', अशी माहिती पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या चाहत्यांना मोठा धक्का, 'जेठालाल'चा पत्ता कट?

नाश्त्यासाठी बनवा स्वादिष्ट गाजर पराठा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी

SSC - HSC Exam : १०वी १२वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! पुरवणी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर; वाचा A to Z अपडेट्स

Family History of Hypertension: आई-वडिलांना हाय ब्लड प्रेशर असेल तर सावध व्हा, या ५ सवयी वाचवतील तुमचा जीव

SCROLL FOR NEXT