MUMBAI CRIME BRANCH ARRESTS WOMAN CRICKETER FARHANDA KHAN IN SEXTORTION CASE Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : 'तुझे ते फोटो व्हायरल करेन', महिला क्रिकेटपटूला मुंबई पोलिसांकडून अटक, प्रसिद्ध व्यवसायिकाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं

Mumbai Crime News : मुंबई क्राइम ब्रांचने सेक्सटॉर्शन आणि खंडणी प्रकरणात जम्मू-कश्मीरमधील महिला क्रिकेटर फरखंदा खान हिला अटक केली आहे. व्यावसायिकाकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • महिला क्रिकेटर फरखंदा खान सेक्सटॉर्शन प्रकरणात अटकेत

  • व्यावसायिकाकडून ६० लाखांहून अधिक रक्कम उकळल्याचा आरोप

  • दिल्ली आणि श्रीनगर येथे कारवाई करत तिघांना अटक

  • मुंबई क्राइम ब्रांचकडून पुढील तपास सुरू

संजय गडदे, मुंबई

MUMBAI CRIME BRANCH ARRESTS WOMAN CRICKETER FARHANDA KHAN IN SEXTORTION CASE मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. सेक्सटॉर्शन आणि जबरदस्तीने खंडणी उकळल्याप्रकरणी जम्मू-कश्मीरमधील महिला क्रिकेटर फरखंदा खान हिला मुंबई क्राइम ब्रांचने अटक केली आहे. या कारवाईत तिचा भाऊ बाजिल खान यालाही ताब्यात घेण्यात आले असून, दोघांना नवी दिल्लीतील एका हॉटेलमधून पकडण्यात आले. तसेच या प्रकरणातील तिसरा आरोपी उद्दीन इम्तियाज वानी याला श्रीनगरमधून अटक करण्यात आली आहे. या घटनेने क्रीडाक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा कुलाबा परिसरातील व्यावसायिक आहे. त्याची ओळख २०२४ मध्ये फरखंदा खानसोबत झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री वाढली. हळूहळू चॅटिंगद्वारे त्यांचं बोलणं होऊ लागलं. मात्र, नंतर आरोपीने अश्लील स्वरूपाचे चॅटिंग करून व्यावसायिकाला जाळ्यात ओढले आणि त्यानंतर पैशांची मागणी सुरू केली.

व्यवसायिकाने सुरुवातीला पैसे देण्यास नकार दिला, परंतु फरखंदा आणि तिच्या साथीदारांनी फिर्यादीला धमकावत, “पैसे न दिल्यास खासगी चॅट आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू,” अशी धमकी दिली. या भीतीमुळे फिर्यादीने ३० एप्रिल २०२४ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत तब्बल ३२ व्यवहारांद्वारे एकूण २३.६१ लाख रुपये आरोपींच्या खात्यात ट्रान्सफर केले.

सतत येणाऱ्या धमक्यांचा दबावाखाली येऊन जानेवारी २०२६ मध्ये फिर्यादी व्यवसायिकाने आरोपींच्या खात्यात आणखी ४० लाख रुपये जमा केल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण व्यवहाराची सुरुवात एप्रिल २०२४ मध्ये केवळ २० हजार रुपयांपासून झाली होती, मात्र पुढे हा आकडा लाखोंमध्ये पोचला.

याप्रकरणी व्यवसायिकाने हिंमतीने पोलीस ठाणे गाठत सदर महिला आणि तिच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला. घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन पोलिसांनी म्मू-कश्मीरमधील महिला क्रिकेटर फरखंदा खान आणि तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. मुंबई क्राइम ब्रांचकडून पुढील तपास सुरू आहे. आरोपींच्या इतर संभाव्य गुन्ह्यांचाही तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maida Side Effects: 21 दिवस मैद्याचे पदार्थ न खल्ल्याने शरिरात होतात हे ७ हेल्दी बदल

Periods Back Pain : पीरियड्समध्ये पाठदुखीच्या असाह्य वेदना होतील कमी, पटकन करा 'हा' उपाय

PM Kisan Mandhan Yojana: आता शेतकऱ्यांनाही दरमहा ₹३००० पेन्शन मिळणार, काय आहे सरकारची योजना अन् अर्ज कसा करायचा?

Maharashtra News Live Update: पश्चिम बंगालच्या मुर्शिराबादमध्ये मतदानादरम्यान दगडफेक

Ashok Saraf: अशोकमामा आणि संकर्षण कऱ्हाडे येणार एकत्र; अभिनेत्याने फोटो शेअर करत म्हणाला, 'आम्हाला दोघांना एकत्रं...'

SCROLL FOR NEXT