IT raid on Rahul Kanal Saam Tv
मुंबई/पुणे

शिवसेनेला आणखी एक धक्का; आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर IT ची धाड!

शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकल्याची घटना ताजी आहेच. त्यातच भर म्हणून आज शिवसेनेच्या (Shivsena) आणखी एका नेत्याच्या घरी ITची (Income Tax) छापेमारी सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई: शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर आयकर विभागाने धाड टाकल्याची घटना ताजी आहेच. त्यातच भर म्हणून आज शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या घरी IT ची छापेमारी सुरू आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे.

आज सकाळीच आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर त्यांनी छापेमारीस सुरू केली. यावेळी त्यांच्या घराबाहेर केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे या परिषदेत राऊत कोणता घोटाळा बाहेर काढणार याकडे लक्ष लागले आहे.(IT raid on Rahul Kanal)

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी शिर्डी देवस्थानचे ट्स्टी आणि युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला आहे. आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलच्या परिसरातील नाईन अल्मेडा इमारतीतील कनाल यांच्या घरी आले आणि त्यांनी घराची झाडाझडती सुरू केली आहे. सध्या राहुल कनाल हे घरी आहेत की नाही याची माहिती मिळू शकली नाही.(Rahul Kanal News)

हे देखील पहा-

कोण आहेत राहुल कनाल?

राहुल कनाल हे प्रसिद्ध उद्योजक आहेत. तसेच ते युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांचे ते निकटवर्तीय आहेत. या शिवाय शिर्डी देवस्थान समितीवर ते पदाधिकारीही आहेत.

आदित्य ठाकरे या कारवाईवर काय म्हणाले;

आधी देखील अशी आक्रमण झाली आहेत. ही दिल्लीची आक्रमण आहेत. ही भाजपची प्रचार यंत्रणा झाली आहे. महाराष्ट्र झुकणार नाही आणि थांबणार नाही अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे या कारवाईवर दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT