Ironman Hardik Patil , Virar saam tv
मुंबई/पुणे

Virar : पेट्रोल बॉम्ब हल्ल्याला वर्ष झालं, भारताचा ‘आयर्नमॅन’ आजही जिवाच्या भीतीनं जगताेय

हार्दिक पाटीलने आपल्या जिवाला धाेका असल्याचे म्हटलं आहे.

चेतन इंगळे

Ironman Hardik Patil: विरार (virar) येथील आयर्नमॅन हार्दिक पाटील यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. गेले तीन महिन्यांपासून पाटील यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यांच्या घरावरील पेट्रोल बॅाम्ब हल्ल्यातील मुख्य सूत्रधार, कट कारस्थान रचणाऱ्या आणि धमकी देणाऱ्या फरार तीन संशयित आरोपींना लवकरात लवकर पकडले जावे अशी मागणी पाटील यांनी पत्रकार परिषदेतून पाेलीस दलास केली आहे. (Breaking Marathi News)

आयर्नमॅन हार्दिक पाटील यांच्या निवासस्थानी ४ मे २०२१ रोजी पेट्रोलचा बाँम्बचा मारा करण्यात आला होता. विरार पोलिसांनी या प्रकरणी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, कट कारस्थान रचणे या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आतापर्यंत ७ संशियत आरोपींना अटक केली आहे. यातील दोन संशियत आरोपींचा शाेध सुरु आहे. (Ironman Hardik Patil Latest Marathi News)

कांचन ठाकूरला कोर्टाने (court) अंतरिम जामीन दिला होता पण तो आता फेटाळल्याने या फरार संशयित आरोपीला अटक करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाचे धागेदोरे भारतात नसलेले सनी उर्फ रोहन ठाकूर यांच्या पर्यंत पोहोचले असल्याने पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केल्याची माहितीही त्यांनी दिली. (Tajya Batmya)

सनी यांच्या सांगण्यावरून मुंबईतील गोल्डन गॅंगचा सदस्य शैलेंद्र खोपडे हा मागील दोन ते तीन महिन्यापासून हार्दीकला व्हाट्सअप कॉलच्या माध्यमातून जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत असल्याने याबाबतही विरार पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. याबाबत व्हाट्सअप कॉल रेकॉर्डिंग करून पुरावे कोर्टात आणि विरार पोलिसांना दिल्याचे पाटील यांनी सांगितले. (Virar Latest News)

माझ्या जीवाचे भविष्यात काही बरे वाईट झाल्यास सनी ठाकूर व गुन्ह्यातील इतर आठ संशयित आरोपी जवाबदार असतील असे पाटील यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. भारत देशाचे प्रतिनिधीत्व जगातील स्पर्धेत करत असून माझ्याच जीवाला धोका निर्माण झाला असताना फरार आरोपींना पकडण्याची मागणी करावी लागणे ही शोकांतिका असल्याचेही पाटील यांनी नमूद केले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

Rajya Sabha Election: मोठी बातमी! राज्यसभेसाठी भाजपकडून ८ उमेदवारांच्या नावाची घोषणा, कुणाला दिली संधी?

SCROLL FOR NEXT