Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

संजय राऊतांच्या आरोपानंतर ED विरोधात तपास सुरू, SIT स्थापन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: ईडीचे (ED) अज्ञात अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याच्या आरोप करण्यात आले आहेत. या आरोपामुळे आता SIT स्थापन करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईडी अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा आरोप (Allegations) करण्यात आला होता. आरोपांचा तपास करण्यासाठी मुंबई (Mumbai) पोलिसांकडून या विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या एसआयटीचे नेतृत्व अतिरिक्त पोलिस आयुक्त (गुन्हे) वीरेश प्रभू तपासाचे नेतृत्त्व करणार आहे. त्यांच्या नेतृत्त्वात या प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, काही दिवसांअगोदरच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना भाजप आणि ईडी अधिकाऱ्यांवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी ईडीचे अधिकारी वसुली करत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला होता. तसेच संजय राऊतांनी जितेंद्र नवलानी यांच्यावर देखील आरोप करण्यात आला होता. तरीदेखील खंडणी वसुलीच्या कटात सहभागी असल्याचे सांगितले होते. या अगोदर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या (police) EOW विंगकडून केला जात होता. त्यावेळी EOW ने ७ लोकांचे जबाब नोंदविण्यात आले होते आणि ज्या कंपन्यांच्या खात्यात पैसे कथितरित्या गेले होते. त्या कंपन्यांशी संबंधित लोकांना चौकशीसाठी बोलावले होते.

मुंबईतील केंद्रीय तपास यंत्रणांची कार्यालय ही खंडणीखोर बनली असल्याची घणाघाती टीका संजय राऊत यांनी यावेळी केली होती. महाराष्ट्राला कसे लुटले, कोट्यवधींची अफरातफर करण्यात आली याची सगळी माहिती उघड करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले होते. कुणाला आमच्या आंगावर यायचं असेल त्यांनी जरूर यावे. एक दिवस त्यांना या ठिकाणाहून तोंड काळे करूनच जावं लागणार आहे. आम्ही लवकरच ट्रकच्या ट्रक ईडी ऑफिसवर घेऊन जाणार आहोत. तसेच, लवकरच ईडीचा सर्वात मोठा घोटाळा याचं ठिकाणी बसून बाहेर काढणार आहोत, असे देखील त्यावेळी संजय राऊत यांनी सांगितले होते. गुन्हेगारीचे हे सिंडिकेट उघड करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला होता.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT