Mumbai Nalesafai News Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Nalesafai News: पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईच्या कामांची एकनाथ शिंदेकडून पाहणी, मुख्यमंत्री स्वत: नाल्यात उतरले

Mumbai Nalesafai News: गोखले ब्रीज हा अत्यंत महत्त्वाचा ब्रीज आहे. त्यामुळे याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

Mumbai News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाआधी मुंबईतील नालेसफाईचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी आज पश्चिम उपनगरातील सांताक्रुज मिलन सब वेपासून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांनी आज अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूलाची देखील पाहणी केली.

गोखले पूल लवकरात लवकर कसा उभारता येईल आणि जनतेला दिलासा कसा देता येईल याकडे लक्ष अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत भाजप खासदार गोपाळ शेट्टी, मंत्री मंगलप्रभात लोढा, योगेश सागर, प्रकाश सुर्वे आणि महापालिका प्रशाशक इक्बालसिंह चहल देखील उपस्थित होते. (Mumbai News)

गोखले ब्रीज हा अत्यंत महत्त्वाचा ब्रीज आहे. त्यामुळे याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यासाठी लागणारे एका विशिष्ट प्रकारचे स्टील पुरवठादराने पुरवलं आहे. अजूनही काही स्टील लागते तेही लवकर मिळेल. मी स्वतः जिंदाल यांच्याशी बोलून ते स्टील पुरवण्यास सांगणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी म्हटलं.

दिवाळीपर्यंत पूल सुरू करण्याचे प्रयत्न

दिवाळीपर्यंत पूल सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. त्यामुळे सर्व अडथळे दूर केले जातील. रेल्वे पुलावरून नागरिकांना चालण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी DRM बरोबर बोलणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. (Breaking Marathi News)

मुख्यमंत्री स्वत: नाल्यात उतरले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः नाल्यात उतरून सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओशिवरा येथे नाल्यात सुरू असलेल्या नालेसफाईचे कामाची पाहणी केली. यावेळी नालेसफाई करणाऱ्या कामगारासोबत संवाद साधून त्यांचे काम जाणून घेतले, तसेच त्यांना कामाबद्दल शाबासकी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: 16 व्या मजल्यावरून तरूणी पडली; रक्ताच्या थारोळ्यात पडला निर्वस्त्र मृतदेह, कुटुंबियांकडून हत्येचा आरोप

Maharashtra News Live Update: शहरातील ड्रग्स पेडलर पुणे पोलिसांच्या निशाण्यावर

Mumbai Metro: मुंबई मेट्रोचा 337 किमीपर्यंत विस्तार होणार; उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला भविष्यातील मास्टर प्लॅन

Parbhani Accident : झरी-जिंतूर मार्गावर हिट अँड रन; भीषण अपघातात बहीण-भावाचा जागीच मृत्यू

Shocking : संतपाजनक! खाऊ देण्याच्या बहाण्यानं नराधमानं डाव साधला; अत्याचार करून ७ वर्षीय मुलाची हत्या

SCROLL FOR NEXT