धक्कादायक! गरोदर महिलेस डॉक्टरकडून अमानुष मारहाण; पुण्यातील बड्या रुग्णालयातील प्रकार Saam Tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! गरोदर महिलेस डॉक्टरकडून अमानुष मारहाण; पुण्यातील बड्या रुग्णालयातील प्रकार

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत या ठिकाणी एका रुग्णालयात गरोदर महिलेस डॉक्टरने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत या ठिकाणी एका रुग्णालयात गरोदर महिलेस डॉक्टरने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गरोदर महिलेला प्रसूतीच्या कळा pain येत असल्यामुळे डॉक्टरने ही अमानुष मारहाण doctor beat pregnant woman केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पीडित गरोदर महिलेने यवत पोलीस ठाण्यात आरोपी डॉक्टर विरोधात गुन्हा FIR दाखल करण्यात आले आहे. यवत पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पुढील तपास केला जात आहे.

हे देखील पहा-

पूजा गोरख दळवी असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या गरोदर आहेत. फिर्यादी पूजा दळवी यांना प्रसूती कळा येत असल्यामुळे त्या यवत या ठिकाणील नामांकित जयवंत हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्यामुळे या ठिकाणी असलेल्या एका डॉक्टरने त्यांना अमानुष मारहाण केली आहे. आरोपी डॉक्टरने फिर्यादी महिलेच्या तोंडावर, डोक्यावर, हातांवर, मांडीवर आणि ओठांवर चापटीने आणि बुक्क्याने अमानुषपणे मारहाण केल्याचे तक्रारीत सांगितले जात आहे.

ही मारहाण इतकी अमानुष होती की, या मारहाणीमध्ये पूजा दळवी यांच्या डोळ्याच्या खालच्या बाजूला चेहऱ्यावर काळ्या निळ्या जखमा झाले आहेत. ही घटना उघडकीस येताच हॉस्पिटल आवारात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. मारहाण झाल्यावर पीडित गरोदर महिलेने थेट यवत पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवर, पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मला एकटं पाडण्याचा सरकारचा कट- मनोज जरांगे

MLA Death: ३ वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात हळहळ

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना झटका, ८० लाख लाभार्थी अपात्र; यादीत तुमचं नाव तर नाहीना? ५ मिनिटांत करा चेक

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांचं इन्स्टा अकाऊंट सस्पेंड, पोस्टवर मेटाने मागितलं उत्तर ; पीएम मोदींबद्दल काय म्हणाले होते?

Weight Loss Secrets : जिमसाठी वेळ नाही? घरातील 'ही' २ कामं करून वजन करा कमी

SCROLL FOR NEXT