Satej Patil Saam Tv
मुंबई/पुणे

Satej Patil: बोट दाखवताना हाताची चार बोटं आपल्याकडे आहेत हे विसरू नये : सतेज पाटील

''आम्ही विरोधात होतो तेव्हा आम्हीही त्यावेळी लेखी आणि वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे सरकारला सादर केले होते.''

सुरज सावंत

मुंबई : बोट दाखवत असताना हाताची चार बोटं आपल्याकडे आहेत हे विसरु नये असा टोला आज गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लगावला आहे. मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत महाविकास आघाडीच्या(Mahavikas Aghadi) नेत्यांवर आरोप केले आहेत. या आरोपाचे पुरावेही त्यांनी अध्यक्षांना दिले आहेत. यावर आज गृहराज्यमंत्री सतेज पाटील बोलत होते.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधापक्ष नेते म्हणून सांगितलेल्या माहितीची दखल घेतली जाईल, यावर त्यांना आज गृहमंत्री विधान सभेत उपस्थित राहून उत्तर देतीत असं सतेज पाटील यांनी सांगितले. राज्यात याअगोदरही वेगवेगळ्या नेत्यांची नावं टाकून आरोप झालेले आहेत. दुसऱ्यावर बोट दाखवत असताना हाताची चार बोटं आपल्याकडे आहेत हे विरोधी पक्षाने विसरु नये असही, गृहमंत्री सतेज पाटील म्हणाले.

आम्ही विरोधात होतो तेव्हा आम्हीही त्यावेळी लेखी आणि वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे सरकारला सादर केले होते. काल केलेय्या आरोपांची व दिलेल्या पुराव्यांची सत्यता पडताळली जाईल. आणि मगच गृहमंत्री यावर उत्तर देतील. एक मंत्री म्हणून मी व्यवस्थित माहिती घेऊन विधान भवनात उत्तर देणार असल्याचेही सतेज पाटील (Satej Patil) यांनी सांगितले.

Edited by- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT