From CNG to Milk, Everything Gets Expensive saam tv
मुंबई/पुणे

महागाई आवरेना, पगार पुरेना! सीएनजी, दूध, रिक्षा महागली

CNG, Milk and Auto Fares Get Costlier: महागाईचा भडका उडाल्याने त्यात सामान्य जनता होरपळली आहे. नुकतेच साखरेचे दर वाढलेले असताना आता सीएनजी, रिक्षा, दूध महागलं आहे. एव्हढी महागाई वाढल्यावर सांगा कसं जगायचं ? असा सवाल जनता विचारतेय. पाहूया एक रिपोर्ट..

Girish Nikam

रिक्षाने जायचंय तर आता किमान 30 रुपये लागणार.... गाडीत सीएनजी भरायचाय तर 98 रुपये मोजावे लागणार तर पीएनजीसाठी 53 रुपये हवेत तर दुधासाठी थेट शंभराची नोट खर्च करावी लागणार आहे. आता एव्हढी महागाई वाढल्यावर सांगा कसं जगायचं ? असा सवाल जनता विचारतेय. महागाईच्या चटक्यांनी सामान्य नागरिक पुरता बेजार झालाय. हे केवळ मुंबईतच नव्हे तर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही रिक्षाचा प्रवास महागलाय. नवीन दरानुसार किमान भाडं 25 रुपयांवरून 30 रुपये झालंय. प्रवासासाठी प्रति किलोमीटर 17 रुपयांऐवजी 20 रुपये आकारले जाणार आहेत.

पुण्यात रिक्षाची मीटर दरवाढ लागू झाली असली, तरी CNGच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाल्यानं रिक्षाचालकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटतायंत.... आता एक किलो सीएनजीसाठी 97 रुपये 75 पैसे मोजावे लागणार आहेत. दुसरीकडे मुंबईकरांचाही रिक्षा-टॅक्सी प्रवास महागलाय. रिक्षाचं किमान भाडं 1 रुपयानं तर टॅक्सीचे भाडं 2 रुपयांनी वाढलंय. इंधन, गाड्यांची देखभाल आणि विम्याचा वाढलेला खर्च यामुळे ही दरवाढ करण्यात आलीय.

रिक्षाचं दीड किमीसाठी जुनं भाडं 26 रुपये होते ते आता 27 रुपये झाले आहे. तर टॅक्सीचं जुनं भाडं 31 होते ते आता 33 रुपये झाले आहे.

दरवाढीचा फटका कुठे बसणार आहे पाहूयात...

ऑटो-टॅक्सीची भाडेवाढ कुठे?

मुंबई

ठाणे

नवी मुंबई

कल्याण

वसई-विरार

पालघर

दुसरीकडे महानगर गॅस लिमिटेडने मुंबईत सीएनजीच्या दरात वाढ केलीय. आखाती देशांतील युद्धाचं वातावरण आणि महागड्या गॅस आयातीमुळे दरवाढ झालीये.

मुंबईकरांना महागाईचा झटका

इंधन आधीचे दर दरवाढ आताचे दर

CNG 86 रु. 2 रु. 88 रु. (प्रति किलो)

PNG 52 रु. 1 रु. 53 रु. (प्रति SCM)

मुंबईकरांचा प्रवास महागलेला असतानाच त्यांचा चहाही फिका होणार आहे. कारण म्हशीच्या सुट्या दुधाच्या दरात प्रतिलिटर 9 रुपयांची वाढ झालीय. मुंबई दुग्ध उत्पादक संघाने घेतलेल्या या निर्णयामुळे दुधाचा घाऊक दर 93 रुपयांवरून थेट 102 रुपये प्रतिलिटर झालाय. जनावरांचा चारा आणि खाद्याच्या किमतीत 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने दरवाढ झाली आहे.

एकीकडं जेमतेम पगार आणि दुसरीकडे महागाईची मार अशी सामान्यांची अवस्था झालीय. कारण दुधापासून भाज्या, साखर, तांदूळ, इंधन सगळंच महागल्याने सामान्य जनता होरपळली आहे. ऐन सणासुदीला महागाईचा भडका उडाल्यानं सरकार यावर काही तोडगा काढून दिलासा देणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भापुण्यात अटक झालेल्या कार्यकर्त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी

शिवसेना पक्ष-चिन्ह कुणाचा? सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी, एकनाथ शिंदे दिल्लीत; धनुष्यबाण गोठवण्याच्या मागणीवर मोठं विधान

मुंबईला जाणारा OBC मोर्चा पुण्यात रोखला; आंदोलनावरून OBC संघटनांमध्ये फूट

युतीची चर्चा फिस्कटली! भाजपचा एकला चलो चा नारा, राजकारणात खळबळ

Chirag Paswan : मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT