Uddhav Thackeray Latest Speech Saam Tv
मुंबई/पुणे

Political News: 'मोदी स्टेडियमवर पाक खेळाडूंवर पुष्पवर्षाव', उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला हल्लाबोल

Uddhav Thackeray On BJP: 'मोदी स्टेडियमवर पाक खेळाडूंवर पुष्पवर्षाव', उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला हल्लाबोल

Satish Kengar

>> गिरीश कांबळे

Uddhav Thackeray Latest Speech:

'संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये मुंबईसाठी त्यावेळी सगळे एकत्र आले होते. तेव्हा जनसंघ त्यात घुसला होता. त्यांना घुसण्याची सवयच आहे. कशासाठी तर काही जागा लढवता आल्या तर पाहाव्यात म्हणून', अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. आज ठाकरे गटाची समाजवादी जनता पक्षासोबत युती झाली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले, ''ज्यावेळी त्यांना कळलं की, हिंदू मत एकत्र करून निवडणुका जिंकता येतात. तेव्हा ते आमच्या सोबत आले. आज तुम्ही माझ्यासोबत आलात. काही नकोय तुम्हाला. पण तुम्ही मागितलं तरी मी काहीच देऊ शकत नाही. माझ्या हातात काहीच नाही.''

उद्धव ठाकरे म्हणाले, ''भाजप म्हणजे दुसऱ्या कोणाला मोठं होऊ द्यायचं नाही, ही त्यांची वृत्ती आहे. यांनीच नितीश आणि लालू यांचं सरकारमध्ये घुसून फूट पडली.'' ते म्हणाले, ''पाकिस्तानच्या खेळाडूंवर फुलांचा वर्षाव करता मग मी समाजवाद्यांसोबत आलो तर काय अडचण काय आहे. या समाजवाद्यांमध्ये मुस्लिम आहेत. भारतावर प्रेम करणारे हे मुस्लिम आहेत.'' (Latest Marathi News)

ठाकरे म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सरकारने निर्णय घेतला म्हणून लोक रस्त्यावर उतरले. 2012 साली आम्ही महानगर पालिका एकत्र लढत होतो. त्यावेळी गोपीनाथ मुंडे माझ्याकडे आले. त्यांनी विचारलं काय करायचं? त्यावेळी एक शब्द तोंडातून आला आणि त्यावरच आम्ही जिंकलो ' करून दाखवलं'. आपल्याला आता करून दाखवायचं आहे, असं कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी याना लक्ष्य करत उद्धव ठाकरे म्हणाले, ''मोदी बोलत होते पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी होणार. प्रमोद महाजन यांचं स्वप्न होतं रुपया आणि डॉलर एक भाव झाला पाहिजे. 2014 साली काय भाव होता? आता 84 रुपये आहे. युद्धांमुळे भाव घसरला, असं सांगितलं. नेतन्याहू यांच्या विरोधात इस्राईलमध्ये लोकं रस्त्यावर उतरले आहेत. जर चुकीचं होत असेल तर नेत्याच्या विरोधात रस्त्यावर उतरलं पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: लाडक्या बहिणीमुळे आमचा विजय - अजित पवार

Maharashtra Election Result: महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT