mumbai police  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Police : तब्बल १० हजारांहून अधिक फोन कॉल, अन् अश्लील संवाद, तीन वर्षांनंतर तरुणाला बेड्या

गेल्या अनेक दिवसांपासून तो मुंबई पोलिसांना १०० नंबर क्रमांकावर फोन करत होता.

Ruchika Jadhav

Mumbai News: मुंबईमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या तीन वर्षापासून महिला पोलिसांना कॉल करून अश्लील संवाद साधणाऱ्या नराधमाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तो मुंबई महिला पोलिसांना १०० नंबर क्रमांकावर फोन करत होता. तरुणाच्या या कृत्याने महिला पोलीस संतप्त झाल्या होत्या. अखेर हा नराधम पोलिसांच्या हाती लागला आहे . (Latest Mumbai Police News)

पोलिसांनी या नराधमाचा अधिक वेगाने शोध सुरू केला. अशात आता २२ वर्षीय तरुणाला मालाड परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या सीआययू पथकाने ही कारवाई केली आहे. हा तरुण मुलींशी अश्लील संवाद साधताना पकडले जाऊनये यासाठी सिमकार्ड शिवाय फोन वापरत होता. त्यामुळे त्यांच लोकेशन ट्रेस करून त्याला शोधणे पोलिसांसाठी कठीण झाले होते.

या नराधमाची अधिक चौकशी केली असता आणखीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीन वर्षांत त्याने तब्बल १०,८०० हून अधिक फोन केले आहेत. साल २०२० पासून १०० नंबरवर फोन करून तो अश्लील भाषेत संभाषण करायचा. सदर आरोपी ऑटिझमने ग्रस्त असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवलं; माहेरच्या लोकांकडून घरासमोर पार्थिवावर अंत्यविधी

Soham Bandekar Marriage: लाडक्या आदेश भाऊजींच्या घरी लगीनघाई! होणारी सुनबाई आहे तरी कोण?

Nagpur Politics : ठाकरेंना मोठा झटका, १२ वर्षे शिवसेनेत काम केलेल्या तरूण नेत्याचा राजीनामा, २ कारणंही सांगितली

Maharashtra Live News Update: आगामी निवडणुकी साठी महायुतीची बैठक.

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; जवळचा नेता भाजपने गळाला लावला

SCROLL FOR NEXT