Chandannagar Police Station, Pune, Pune Crime News, Pune News गोपाल मोटघरे
मुंबई/पुणे

पुणे: बायकोच्या मैत्रिणीशी ओळख वाढवली; पतीसह त्याच्या मित्रानेही केले भयंकर कृत्य!

जिल्ह्यातील चंदननगर परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. पत्नीच्या मैत्रीणीसोबत ओळख वाढवून पतीने तिच्यावर बलात्कार केला आहे.

गोपाल मोटघरे

गोपाल मोटघरे

पुणे: जिल्ह्यातील चंदननगर परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. पत्नीच्या मैत्रीणीसोबत ओळख वाढवून पतीने तिच्यावर बलात्कार (Sexual Assault) केला आहे. तसेच पीडितेची छायाचित्रे व व्हिडीओ समाजामाध्यमांमध्ये प्रसारीत करण्याची धमकी देऊन तिच्याकडून पैसे उकळले आहेत. एवढेच नव्हे तर, पतीच्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केला आहे. तर, दोनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Pune Crime News)

सिद्धार्थ मधुकर श्रीखंडे आणि आशिष विजय कांबळे अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ श्रीखंडे हा पिडीत तरुणीच्या मैत्रीणीचा पती आहे. त्याने समाजमाध्यमाद्वारे तरुणीला "तु मला खूप आवडते', अशा आशयाचा संदेश पाठविला होता.

हे देखील पहा-

त्यानंतर, त्याने फिर्यादीशी ओळख वाढवून तिला तो बाहेर फिरायला घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी त्याने आपल्या मोबाईलमध्ये पीडित तरुणीचे नग्न अवस्थेतील त छायाचित्रे व व्हिडयो काढले होते. त्यानंतर त्याने संबंधित व्हिडीओ व छायाचित्रे समाजामध्यमांमध्ये प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीकडून 17 हजार रुपये उकळले होते. त्यानंतर सिद्धार्थचा मित्र आशिष यानेही तरुणीला धमकाविण्यास सुरुवात केली. आशिषनेही तरुणीवर बलात्कार केला. त्याने तरुणीला मारहाण करुन पैशांची मागणी केली. दरम्यान, दोघांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून व घाबरुन तिने पोलिसांकडे फिर्याद दिली. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये शिवसेना मनसेची युती होणार का?

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय?

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

SCROLL FOR NEXT