Devendra Fadnavis Saam TV
मुंबई/पुणे

'हा' महाभयंकर कट, फडणवीस आणि सरकारी वकिलांची सुरक्षा वाढवा'

'सरकारी वकिलांची देखील सुरक्षा वाढवावी. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेले पुरावे ज्या कटाबद्दल होते. त्या कटाचा मास्टर माईंड विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण (Advocate Pravin Chavan) आहेत.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : विरोधकांना नामोहरम करण्याचा कट कसा रचला जातोय हे उघड करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करा, अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना शेलार म्हणाले की, 'हा महाभयंकर कट असून विरोधी पक्षनेते 'देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या पुराव्यात बेकायदेशीर शस्त्रास्त्रांचा वापर, पोलीस यंत्रणाचा गैरवापर या सर्व बाबींचे धागे-दोरे एकमेकांशी गुंतलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तेचा कट देखील उलगडला आहे. एकूण पाहता हा महाभयंकर कट दिसत असल्याने देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा तात्काळ वाढवावी अशी मागणी आमदार आशिष शेलार यांच्याकडून करण्यात आली आहे.

सरकारी वकिलांचीही सुरक्षा वाढवा -

सरकारी वकिलांची देखील सुरक्षा वाढवावी. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेले पुरावे ज्या कटाबद्दल होते. त्या कटाचा मास्टर माईंड विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट प्रविण चव्हाण (Advocate Pravin Chavan) आहेत. त्यामुळे विशेष सरकारी वकील चव्हाण यांच्याशी कोणाच्या गाठीभेटी होत आहेत. कोण व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात अथवा घरी जात आहेत. यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. एवढ्या मोठ्या गटाचे मास्टरमाइंड चव्हाण असल्याने त्यांचीही सुरक्षा महत्त्वाची असून राज्य सरकारने विशेष सरकारी वकील यांनादेखील अधिक सुरक्षा पुरवावी अशीही मागणी अशी शेलार यांनी केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangalsutra Paan Design: वटपोर्णिमेसाठी ट्राय करा पानाचे सुंदर मंगळसूत्र, पाहा या ७ ट्रेंडी डिझाइन्स

Crime: अमरावती हादरले! बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला, भरचौकात धारदार शस्त्राने वार करत तरुणाला जागीच संपवलं

Vidhan Parishad Election: राज्यभरात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी; कुठे बिनविरोध, कुठे होणार लढत

Monsoon Update 2026 : मान्सून सर्वात शेवटी कोणत्या राज्यात पोहोचतो? कारण जाणून घ्या

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये डोमेस्टिक गॅस सिलेंडरच्या काळाबाजाराचा पर्दाफाश; 251 सिलेंडर जप्त

SCROLL FOR NEXT