Mumbai Dam  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Dam Water Level : मुंबईकरांना दिलासा! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

Mumbai Rains News : 24 तासात झालेल्या मुसळधार पावसानंतर हाच पाणीसाठा 8.94 टक्के झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

Mumbai News : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात बुधवारी दिवसभर  पावसाचा जोर कायम होता. या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात 24 तासात 1.68 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये काल 7.26 टक्के पाणीसाठा होता. तर 24 तासात झालेल्या मुसळधार पावसानंतर हाच पाणीसाठा 8.94 टक्के झाला आहे.

 मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणारे 7 धरण आणि भातसा धरणातील शिल्लक पाणीसाठा मिळून मागील 24 तासात 12.57 टक्क्यांहून वाढून 14.61 टक्के झाला आहे. म्हणजे एकूण पाणीसाठ्यामध्ये जवळपास 2.04 टक्के पाणीसाठा वाढला आहे. तुळसी आणि विहार धरणामध्ये मागील 24 तासात सर्वाधिक पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

मागील 24 तास किती टक्के पाणीसाठा वाढला?

  • अप्पर वैतरणा - 00%

  • मोडक सागर- 3.1 %

  • तानसा - 3.11%

  • मध्य वैतरणा- 2.65 %

  • भातसा - 1.02%

  • विहार - 4.61%

  • तुळसी -7.18 %

मुंबईत 10 टक्के पाणीकपात

मुंबई महापालिकेने 1 जुलैपासून 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. मात्र धरण क्षेत्रामध्ये मागील दोन दिवसात दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील दिवसांमध्ये अशाच पद्धतीने धरण क्षेत्रात पाऊस पडल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर मुंबई महापालिका प्रशासन या निर्णयासंदर्भात फेरविचार करू शकते. मात्र सध्या तरी 1 जुलैपासून मुंबईमध्ये पाणीकपातीचा निर्णय लागू करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sea Fort : चारही बाजूंनी अथांग समुद्र अन् मध्यभागी भव्य किल्ला, मुंबईजवळच आहे दगडी बेटावरचा ऐतिहासिक जलदुर्ग

Maharashtra News Live Update: लातूर जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळला, उभ्या पिकांवरून फिरवला नांगर

Shocking : रात्री दारू पार्टी करून झोपले, सकाळी उठलेच नाहीत, १९ जणांचा मृत्यू

Sunthach Paani: दररोज सकाळी न चुकता प्या सुंठाचं पाणी; मिळतील हे 6 चमत्कारिक फायदे

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धीवर अपघाताचा थरार! भरधाव कारची ट्रकला धडक, आयटी इंजिनिअरसह तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT