पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोना हॉट-स्पॉट गावांच्या संख्येत वाढ Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्याच्या ग्रामीण भागात कोरोना हॉट-स्पॉट गावांच्या संख्येत वाढ

मागील बारा दिवसांपूर्वी हॉटस्पॉट गावांची संख्या आंबेगाव, खेड तालुक्‍यात 4 ने हॉटस्पॉट गावांची संख्या वाढलेली दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश गाडे

पुणे जिल्ह्यातील (Pune District ) ग्रामीण कोरोना संसर्ग (Coronavirus) आटोक्‍यात येत नसून, पंधरा दिवसांपूर्वी कमी झालेली हॉटस्पॉट (Hotspot) गावांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या 13 तालुक्‍यांत एकूण 91 हॉटस्पॉट गावे आहेत. त्यामध्ये खेड,आंबेगाव,जुन्नर आणि पुरंदर तालुक्‍यात सर्वाधिक हॉटस्पॉट संख्या आहे. ज्या गावात दहापेक्षा जास्त करोना बाधित रुग्ण आहेत, ती गावं हॉटस्पॉट म्हणून जाहीर कले जाते.

मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून ग्रामीण भागातील बाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे महिनाभरात ही संख्या आणखीन कमी होईल, या आशेने आरोग्य विभागही निवांत झाले होते पण हॉटस्पॉट संख्या कमी होण्याएवजी त्यामध्ये आता वाढ झाली आहे.

मागील बारा दिवसांपूर्वी हॉटस्पॉट गावांची संख्या आंबेगाव, खेड तालुक्‍यात 4 ने हॉटस्पॉट गावांची संख्या वाढलेली दिसत आहे. तर जुन्नरमध्ये आणि पुरंदरमध्येही प्रत्येकी 5 ने वाढ झाली आहे. तर मावळ, हवेली, शिरूर, वेल्हा तालुक्‍यात हॉटस्पॉट संख्येत घट झाल्याचे दिसून येते आहे.

21 जून रोजी पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय हॉटस्पॉट गावांची संख्या

बारामती - 9, दौंड - 6, मावळ - 7, हवेली - 9 , खेड - 13, आंबेगाव - 10, जुन्नर - 16, शिरूर - 4, पुरंदर - 10, इंदापूर - 2, मुळशी - 3, भोर -1, वेल्हा - 1.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गरब्यात मुस्लिमांना नो एण्ट्री? 'हिंदू बना आणि गरब्याला या'; नितेश राणेंच्या विधानानं नवा वाद

Today's Horoscope : गणपती बाप्पाच्या कृपेने 'या' राशींची लॉटरी, तर काहींच्या नशिबात संकटांचा डोंगर; पाहा आजचे राशीभविष्य

Friday Horoscope: अडकलेली कामं मार्गी लागणार, तर काहींना मिळणार नव्या संधींचे संकेत; वाचा राशीभविष्य

'धनुष्यबाण चिन्ह गोठवा, चोरांना देऊ नका'; एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंची मागणी

Gautami Patil: दहीहंडीतला डान्स गौतमीला भोवणार; सण-उत्सवातील अश्लील डान्सचा वाद पेटला

SCROLL FOR NEXT