NCP
NCP  Saam TV
मुंबई/पुणे

राष्ट्रवादीच्या आंदोलनात ''अंदर की बात है, तात्या हमारे साथ है'' च्या घोषणा!

वृत्तसंस्था

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या वक्तव्या विरोधात पुण्यामध्ये आंदोलन छेडले. राज ठाकरे मुर्दाबाज अशी घोषणाबाजी करण्यात येत आहे. पुण्यातील कोंढवा भागात राष्ट्रवादी चे नगरसेवक हाजी गफूर पठाण यांनी राज ठाकरेंनी भोंग्याच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

पुण्याचे राष्ट्रवादीचे (NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांचाही सहभाग होता. राष्ट्रवादीच्या या आंदोलनातून सूचक घोषणा करण्यात येत आहे. "अंदर की बात है, तात्या हमारे साथ है" अशा घोषणा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत आहेत. वसंत मोरे (Vasant More) यांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या भाषणात मुस्लीम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. मशिदीवरील भोंगे उतरवा नाहीतर त्याच मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा असे आदेश राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना शिवाजी पार्कवरुन दिले. त्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले. राज ठाकरे यांच्या पक्षातील काही मुस्लीम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.

पुण्यातील मनसेचे माजी शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल सहमत नसल्याचे सांगितले. त्यानंतर राज ठाकरेंनी वसंत मोरे यांची शहर अध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली. नगरसेवक साईनाथ बाबर यांना नवीन शहर अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. राज ठाकरेंच्या भूमिकेने राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते नाराज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Forecast: विदर्भ तापला, मराठवाड्यात उष्णतेच्या झळा; सोमवारपासून पुन्हा कोसळणार पाऊस

Brazil Flood: ब्राझीलमध्ये विनाशकारी महापूर, हजारो घरे पाण्याखाली; आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

SCROLL FOR NEXT