MLA Ravi Rana saam tv
मुंबई/पुणे

तुरुंगात आम्हाला गुन्हेगारापेक्षा वाईट वागणूक; दिल्लीतून न्याय मिळवणार : रवी राणा

MLA Ravi Rana Allegations on CM Uddhav Thackeray : याविरोधात आपण दिल्लीला जात असून आम्हाला न्याय मिळेल अशी आशा असल्याचं रवी राणा म्हणाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (Ravi Rana) यांची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आज ते दिल्लीसाठी (Delhi) रवाना होत आहेत. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तुरुंगात आम्हाला एखाद्या गुन्हेगारापेक्षा वाईट वागणूक दिली असल्याचा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला आहे. तसेच याविरोधात आपण दिल्लीला जात असून आम्हाला न्याय मिळेल अशी आशा असल्याचं रवी राणा म्हणाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यादेखील उपस्थित आहेत.

हे देखील पाहा -

रवी राणा म्हणाले की, आम्ही आज दिल्लीला जात आहे. ज्याप्रकारे एका महिला खासदाराला अत्यंत वाईट वागणूक दिली गेली. पुर्ण पोलीस विभागाचा दुरुपयोग करुन राज्याचे मुख्यमंत्री (Cm Uddhav Thackeray) अत्यंत वाईट, द्वेषी, खुन्नस असे मुख्यमंत्री आहेत. आज त्यांनी बीएमसीला माझ्या फ्लॅटची पाहणी करायला पाठवलं आहे. तर आपणही ऑनलाईन माझ्या फ्लॅटची पाहणी करा. सोबत संजय राऊत आणि अनिल परब यांनीही पाठवा ते खाली बसलेले आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.

रवी राणा पुढे म्हणाले की, राज्यात अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. शेतमजूरांचे प्रश्न आहे. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. औद्योगिक विकास थांबलाय. लोडशेडींगचं प्रमाण, पाणी टंचाईसारखे अनेक प्रश्न आहेत. असं असताना रवी राणा आणि नवनीत राणाला त्रास देण्यासाठी राज्यातील यंत्रणा काम करत असतील, यात राज्याचं भलं होत असेल तर जी कारवाई करायची ती करा. या मुख्यंमंत्र्यांना कोणतंही काम राहिलेलं नाही. राज्यात मुख्यंमंत्री आहे की नाही असं वातावरण आहे असं रवी राणा म्हणाले.

मुख्यमंत्र्यावर टीका करताना पुढे ते म्हणाले की, राज्याचे उप-मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही खार पोलीस स्टेशनमध्ये चहा प्यायलो, हो जरूर चहा प्यायलो. तो चहा आमच्या वकिलांसह आम्हाला दिला. आम्हाला सांगण्यात आलं की, तुम्हाला बेल देत आहोत. साडेबारानंतर आम्हाला सांताक्रूझच्या पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. रात्री साडेबारानंतर नवनीत राणांना त्रास दिला. सकाळी साडेपाचपर्यंत आम्हाला पाणी आणि सतरंजी देण्यात आली नाही. नवनीत राणांना पहाटेपर्यंत उभं रहावं लागलं. अजितदादा यांनी याबाबतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे. तसेच आज आम्ही दिल्लीला जाणार असून देशाचे गृहमंत्री अमित शहा, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांना भेटणार आहोत. दिल्लीतून आम्ही या सर्व अत्याचाराबाबत चौकशी करवून घेणार आहे असं राणा म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये दरोड्याचा कट उधळला, नऊ संशयित महिलांना आरपीएफ पोलिसांकडून अटक

WhatsApp Recharge Feature: गुड न्यूज! आता WhatsApp वरूनच करता येणार मोबाइल रिचार्ज; वापरायचं कसं? या स्टेप करा फॉलो

Sameer Choughule: 'दादरलाच आहात मग घरी या...'; समीर चौघुलेने घेतली राज ठाकरेंची खास भेट, सांगितला तो किस्सा

Raw Mango Pickle Recipe: कैरीच्या लोणच्याचे ५ चविष्ट प्रकार

Bhandup : भांडुपमध्ये मोठी दुर्घटना, पहिल्या मजल्यावरून ९ जण खाली पडले; एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT