Ramdas Athawale Saam Tv
मुंबई/पुणे

२०२४ ला महाराष्ट्रात ब्राह्मण समाजाचा मुख्यमंत्री बसावा: रामदास आठवले

देवेंद्र फडणवीस जरी ब्राह्मण समाजाचे असले तरी ते बहुजन समाजाला न्याय देतात.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: आगामी २०२४ च्या निवडणुकीनंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदी 'ब्राह्मण' समाजाचा मुख्यमंत्री बसावा अशी आमची इच्छा असून त्याकरीता भाजपला पूर्ण समर्थन देणार असल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. रामदास आठवले (Ramdas Athawale) आज मिरा भाईंदर रोड येथे बौद्ध विहार आणि विपश्यना केंद्राच्या लोकार्पणवेळी पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) जरी ब्राह्मण समाजाचे असले तरी ते बहुजन समाजाला न्याय देतात. त्यामुळे आम्हाला २०२४ ला पुन्हा मुख्यमंत्री पदी ब्राह्मण समाजाचे देवेंद्रे फडणवीस हवे आहेत, असंही आठवले म्हणाले.

यावेळी आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. राज ठाकरे यांनी आवर्जून अयोध्या दौरा केला पाहिजे. मात्र  हा अयोध्या दौरा करण्यापूर्वी त्यांनी अंगावर घेतलेल्या भगव्या रंगा प्रमाणे वागावे असा टोलाही ठाकरे यांनी लगावल.

आम्ही ईडी, सीबीआयच्या चौकशा लावत नाही. त्याचा आणि आमचा काही संबंध नाही. त्यांची चौकशी स्वतंत्र असते. चौकशी लावून आम्हाला सरकार पाडायचे नाही. आणि पडले तर आम्ही सरकार स्थापन करणार आहे, असंही आठवले (Ramdas Athawale) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT