Important news for Pune citizens western region water supply closed on tuesday Saam TV
मुंबई/पुणे

Pune Water Supply: पुणेकरांनो, पाणी जरा जपूनच वापरा; मंगळवारी 'या' भागातील पाणीपुरवठा बंद

Pune Water Supply News: पुणेकरांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मंगळवारी पश्चिम पुणे भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Satish Daud

Pune City Water Supply Latest News

पुणेकरांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मंगळवारी पश्चिम पुणे भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. वारजे जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत एसएनडीटी आणि चतु:श्रृंगी जलवाहिनीशी निगडीत काही कामे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चांदणी चौकाकडे जाणाऱ्या जलवाहिनी तसेच कोंढवे-धावडे टाकी येथील जलवाहिनी दुरुस्तीच्या कामांमुळे हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


विशेष बाब म्हणजे, दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी देखील या भागात सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याची साठवणूक करून ठेवावी. तसंच पाण्याचा कमी वापर करावा, असं आवाहन पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून (Water Supply) करण्यात आलं आहे.

गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर वारजे जलकेंद्राच्या अंतर्गत असणारा कोथरू़ड, डेक्कन, कर्वेनगर, शिवाजीनगर, बालेवाडी, पाषाण या भागातील या भागातील पाणी पुरवठा सुरू रहाणार आहे.

दुसरीकडे पर्वती एम एल आर टाकी परिसरातील गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इत्यादी भागातील पाणीपुरवठा बंद राहिल.

पर्वती एच एल आर टाकी परिसरातील सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-१ व २ लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, परिसरासह शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

SCROLL FOR NEXT