Rain Update Saam Tv
मुंबई/पुणे

Weather Updates: मुंबईत येलो अलर्ट, तर राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने येत्या दोन दिवसांमध्ये मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Jagdish Patil

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) येत्या दोन दिवसांमध्ये मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर आज आणि उद्या संध्याकाळी व रात्री वेगवेगळ्या ठिकाणी वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस (Heavy Rain) पडणार असल्याचा अंदाजही प्रादेशिक हवामान विभागानेही व्यक्त केला आहे.

मागील आठवडाभरापासून मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. परवा पुण्यामध्ये तर मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं. अशातच आता हवामान विभागाने पुन्हा एकदा मुंबईसह (Mumbai) राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उद्या संपूर्ण शहरात दिवसभर ढगाळ वातावरण राहणार आहे. तर मुंबई आणि त्याच्या लगतच्या पुणे, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी बुधवार आणि गुरुवारसाठी 'यलो' अलर्ट जारी केला आहे.

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, मुसळधार पावसाचा अंदाज पाहता रायगड, रत्नागिरी (Ratnagiri) आणि सातारा या भागात ‘ऑरेंज’ अलर्ट राहणार आहे. तर मुंबई शहर, त्याची उपनगरे, कोकण आणि गोव्यात येत्या दोन दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे, असे एका खाजगी हवामान अंदाज संस्थेने म्हटले आहे. तसेच 15 सप्टेंबरच्या दरम्यान पाऊस वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर शुक्रवारपासून पाऊस कमी होण्यास सुरुवात होईल असं देखील हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.

पावसाच्या इशाऱ्यांसाठी चार रंगाचे अलर्ट दिले जातात. त्यामध्ये ग्रीन (कोणताही धोका नाही), येलो (कमी धोका), ऑरेंज (मध्यम धोका) आणि रेड (उच्च धोका) (मुसळधार पाऊस) असे अलर्ट देण्यात येतात. त्यानुसार आता मुंबई आणि त्याच्या लगतच्या पुणे, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी बुधवार आणि गुरुवारसाठी यलो अलर्ट दिला आहे. तर रायगड भागात मध्यम पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Edited By - Jagdish patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टीईटी पेपरफुटीप्रकरणी शिक्षक क्रांती संघटना आक्रमक; परीक्षा शुल्क परत करण्याची मागणी

Maharashtra Politics: विमानापेक्षा इमान महत्वाचा...; ठाकरे-फडणवीसांच्या एकत्र विमान प्रवासावरून शिंदे संतापले

Rohit Shetty: रोहित शेट्टींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; 20 कोटींच्या खंडणीची मागणी अन्..., नेमकं काय घडलं?

Hair oil benefits: जर तुम्ही महिनाभर केसांना तेल लावलं नाही तर काय होऊ शकतं?

Karjat Fort : कर्जतमध्ये लपलाय मराठा साम्राज्यातील महत्त्वाचा किल्ला, शत्रूंच्या हालचालींवर ठेवायचे बारीक लक्ष

SCROLL FOR NEXT