'मी घाबरणार नाही, त्यांच्यावर कारवाई करतच राहणार' : आयुक्त कल्पिता पिंपळे  
मुंबई/पुणे

'मी घाबरणार नाही, त्यांच्यावर कारवाई करतच राहणार' : आयुक्त कल्पिता पिंपळे

काल सायंकाळी आयुक्त कल्पिता पिंपळे कासावडवली भागातील मार्केट परिसरात अनाधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणे : कासारवडवली भागातील मार्केट परिसरात अनाधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करताना सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने चाकू हल्ला केला. या घटनेमुळे संपुर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यानंतर आयुक्त कल्पिता पिंपळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपण अशा लोकांवर कारवाई करतच राहणार असल्याचे म्हटले आहे.

हे देखील पहा-

साम ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की, 'आम्ही अशा हल्ल्यांना घाबरणार नाही. मी बरी होवून पुन्हा कारवाई करणार. आम्ही अधिकारी आहोत आमचे कर्तव्य आम्ही करत राहणार अशा लोकांवर पुन्हा कारवाई करणार'.

दरम्यान, काल सायंकाळी, आयुक्त कल्पिता पिंपळे कासावडवली भागातील मार्केट परिसरात अनाधिकृत फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांचे पथकही त्यांच्या सोबत होते. मात्र एका फेरीवाल्यावर कारवाई करण्यासाठी पथक पुढे सरसावत असताना संतप्त फेरीवाल्याने, रागाच्या भरात पिंपळे यांच्यावर चाकूने हल्ला केला. फेरीवाल्याने हल्यातून बचावासाठी त्यांनी डोक्यावर हात धरला. मात्र त्या बचावात त्यांच्या हाताची बोटे तुटून पडली. तर या हल्याचा बचाव करण्यासाठी पुढे सरसावलेल्या त्यांच्या अंगरक्षकाच्याही डाव्या हाताचे एक बोट कापले गेले. त्यानंतर मात्र संबधित पथकाने अमरजित यादवला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अटक केली.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : फलटणच्या डॉक्टरने मुंबईत संपवलं आयुष्य, हातावर लिहिलेल्या मेसेजमध्ये केले गंभीर आरोप; वैद्यकीय अधीक्षक निलंबित

Maharashtra News Live Update:राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

SCROLL FOR NEXT